केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:05 AM2021-06-30T04:05:28+5:302021-06-30T04:05:28+5:30

ईडीच्या पत्रात मांडली कैफियत; देशमुख यांच्याकडून भाजपवरील आरोपाचा पुनरुउच्चार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून आपण ...

Action taken by the Central Government out of political hatred | केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई

केंद्र सरकारकडून राजकीय द्वेषातून कारवाई

Next

ईडीच्या पत्रात मांडली कैफियत; देशमुख यांच्याकडून भाजपवरील आरोपाचा पुनरुउच्चार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून आपण सार्वजनिक जीवनात कार्यरत असून, राजकीय द्वेषापोटी केंद्र सरकारकडून आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी पुन्हा एकदा या आरोपाचा पुनरुच्चार केला.

ईडीने पाठविलेल्या दुसऱ्या समन्सला मंगळवारी उत्तर देताना, चौकशीला कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्यावेळी भाजप राजकीय कारणास्तव आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करीत असल्याचा उल्लेख त्यांचा नामोल्लेख न करता केला. त्यांनी तीनपानी पत्रात नमूद केले आहे की, केंद्र सरकार तपास यंत्रणेवर दबाव टाकून आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत आहे. आपल्याला विनाकारण गोवले जात आहे. ईडीने २५ जूनला माझ्या मुंबई व नागपूर येथील निवासस्थानी छापे टाकून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी माझा जबाबही नोंदविला. तपास यंत्रणेला सर्व सहकार्य करत आलो असून, यापुढेही मी सहकार्य करत राहणार आहे. ‘ईसीआयआर’मध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे मी माझ्या प्रतिनिधींकडून पाठवत आहे. मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. कारण माझे वय ७२ वर्षे असून, विविध व्याधी आहेत. विशेषतः उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे. त्याचबरोबर, सद्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. त्यासाठी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर, रविवारी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांची १० तास चौकशी केल्यानंतर, रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली. बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने आपल्या जबाबात दोघांकडे गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत ४.७० कोटी दिल्याचा कबुली दिली आहे.

...................................

Web Title: Action taken by the Central Government out of political hatred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.