Join us

कंगनाला मुंबई महानगरपालिकेचा दणका; कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 11:38 AM

मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं.

मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आणि अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका करणाऱ्या आणि मुंबईची पीओकेशी तुलना करून अवमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई महानगरपालिकेने आज दणका दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्याच्या कारवाईस मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. ती आज सकाळी साडे दहा वाजता संपली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत भाग तोडण्यास सुरुवात करण्यात आली.  कार्यातलाच्या आतील भागात हातोड्याने तोडकाम करण्यात आले. तर बाहेरील भिंत जेसीबी लावून तोडण्यात आली आहे. असे आहे कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामप्राथमिक माहितीनुसार कंगना हिने आपल्या बंगल्यात 14 ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्विंष्ठग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.कंगनाच्यावतीने कार्यालयावरील कारवाई पुढे ढकलण्याची करण्यात आली होती विनंतीकार्यालयावरील कारवाई पुढे ढकलण्याची विनंती कंगनाच्या वतीनं करण्यात आली होती. मात्र ही कारवाई पुढे ढकलण्यास पालिकेनं नकार दिला होता. त्यामुळे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई होणार हे निश्चित झालं होतं. यावरून कंगनानं एका ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. 'मी मुंबई दर्शनासाठी तयार आहे. विमानतळाच्या दिशेनं निघाले आहे. महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. ते माझं कार्यालय अनधिकृतपणे पाडण्याच्या तयारीत आहेत. मी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी माझं रक्तही देण्यास तयार आहे. त्यापुढे हे काहीच नाहीच,' असं ट्विट कंगनानं केलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :कंगना राणौतमुंबईमुंबई महानगरपालिकाशिवसेना