नियम न पाळणाऱ्या टॅक्सीचालकांवर कारवाई - रावते

By admin | Published: February 28, 2015 01:51 AM2015-02-28T01:51:25+5:302015-02-28T01:51:25+5:30

शेअर टॅक्सीमध्ये महिलांसाठी पहिली सीट राखीव असल्याची घोषणा झाल्यानंतरही महिलांना त्या जागेवर बसू दिले जात नाही व त्यामुळे महिलांच्या

Action on the taxi drivers who do not obey the rules | नियम न पाळणाऱ्या टॅक्सीचालकांवर कारवाई - रावते

नियम न पाळणाऱ्या टॅक्सीचालकांवर कारवाई - रावते

Next

मुंबई : शेअर टॅक्सीमध्ये महिलांसाठी पहिली सीट राखीव असल्याची घोषणा झाल्यानंतरही महिलांना त्या जागेवर बसू दिले जात नाही व त्यामुळे महिलांच्या होणाऱ्या घुसमटीला ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’च्या या रिअ‍ॅलिटीचे कौतुक करून शेअर टॅक्सी स्टॅण्डजवळ राखीव सीटच्या नियमाचे फलकच लावले जाणार असल्याची ग्वाही ‘लोकमत’ला दिली.
या राखीव सीटची घोषणा खुद्द मंत्री रावते यांनीच केली होती. त्यामुळे टॅक्सीचालक या घोषणेची किती गांभीर्याने अंमलबजावणी करतात, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक केले. त्यावेळी या घोषणेबाबत टॅक्सीचालकच अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब समोर आली. तसेच महिलांनाही या राखीव सीटच्या नियमाबाबत काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रसिद्ध केले. या वृत्ताने महिला सुरक्षिततेचा झेंडा हाती घेणाऱ्या संघटनांसह इतर महिलांनीही या ‘रिअ‍ॅलिटी चेक’चे कौतुक केले. राखीव सीटचा नियम ‘लोकमत’मुळेच कळाल्याचे काही महिलांनी फोन करून ‘लोकमत’ला सांगितले. तर दुसरीकडे मंत्री रावते यांनीही ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकचे कौतुक करत या घोषणेची अंमलबजावणी करण्याची सूचना परिवहन अधिकाऱ्यांना करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Action on the taxi drivers who do not obey the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.