त्रुटी ठेवणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Published: July 25, 2015 01:15 AM2015-07-25T01:15:34+5:302015-07-25T01:15:34+5:30
एप्रिल-मे २०१५मध्ये अकृषी विद्यापीठात घेण्यात आलेल्या परीक्षांमधील त्रुटीस जे जबाबदार असतील त्यांच्यावर महाराष्ट्र विद्यापीठे अधिनियम, १९९४च्या तरतुदीनुसार कडक कारवाई करावी.
मुंबई : एप्रिल-मे २०१५मध्ये अकृषी विद्यापीठात घेण्यात आलेल्या परीक्षांमधील त्रुटीस जे जबाबदार असतील त्यांच्यावर महाराष्ट्र विद्यापीठे अधिनियम, १९९४च्या तरतुदीनुसार कडक कारवाई करावी.
तसेच अशा प्रकारांना आळा बसविण्यासाठी आपण काय उपाययोजना केली याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांमधील कुलगुरूंना दिले आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये एप्रिल-मे २०१५च्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये प्रश्नांबाबतच्या गंभीर त्रुटी इत्यादीबाबत सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. तर काही विद्यापीठाच्या अक्षम्य चुकांमुळे पुनश्च परीक्षा घेण्याची वेळ आली. विद्यापीठांनी केलेल्या चुका या विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी, प्राश्नीक (पेपर सेटर) इत्यादीचे दोष असल्याचे दिसून आले.