अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By admin | Published: February 1, 2015 11:12 PM2015-02-01T23:12:11+5:302015-02-01T23:12:11+5:30

कल्याण तालुक्यातील तहसीलच्या (महसूल) अंतर्गत येणाऱ्या जागेवरील अनधिकृत बांधकामांवर महसूलचा हातोडा पडला.

Action on unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Next

उमेश जाधव,  टिटवाळा
कल्याण तालुक्यातील तहसीलच्या (महसूल) अंतर्गत येणाऱ्या जागेवरील अनधिकृत बांधकामांवर महसूलचा हातोडा पडला. या कारवाईत हजारो अनाधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात सरकारी, आदिवासी आणि गुरेचरणीच्या जागांवर बांधकामे सुरू आहेत. बांधकाम व्यवसायिक राजरोसपणे येथे अनधिकृत बांधकाम करत आसल्याच्या तक्रारी कल्याण प्रांत आणि तहसील कार्यालयात वारंवार येत होत्या. परंतु, गेल्या वर्षापासून संपूर्ण यंत्रणा निवडणूक कामकाजात व्यस्त आसल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही.
घोटसई ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नं. ३५, ३६ आणि ३७ या आदिवासींना देण्यात आलेल्या जागांवर विकासकांनी अनधिकृत चाळींची बांधकामे केली होती. या विषयी जिल्हाधिकारी ठाणे, कल्याण प्रांत व तहसिल कार्यालयात आदिवासींच्या अनेक तक्रारी होत्या. यामुळेच या बांधकामांवर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय आधिकारी धनंजय सावलकर आणि तहसिलदार किरण सुरवसे यांच्या आदेशाने बांधकामे उध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई नायब तहसिलदार शाम सुतार यांच्या देखरेखीखाली झाली.
३८ विकासकांनी १६ हेक्टरमध्ये हजारो चाळीत बांधलेल्या रुम्स् यावेळी तीन जेसीबींच्या सहाय्याने भुईसपाट केल्या. आज पर्यंतच्या इतिहासातील कल्याण तालुक्यातील ही महसूल विभागाची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत बांधकाम व्यावसायिकांचे करोडोचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई थांबविण्याकरिता विकासकांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही न बधता संबंधित विभागाने आपली कारवाई सुरू ठेवली.
या जमिन पुन्हा शासन जमा होणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. अशा प्रकारची कारवाई तालुक्यातील इतर ठिकाणच्या अतिक्रमणांवर करण्यात येणार आसल्याचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी सांगीतले. या कारवाईत शाम सुतार नायब तहसिलदार, दोन मंडळ, अधिकारी, तलाठी, पो.नि.व्यंकट आंधळे, दोन पिएसआय, ३० पो.कर्मचारी, ५ महिला पो.कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Action on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.