Join us  

म्हाडा वसाहतींमधील अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:34 AM

म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत.

मुंबई : म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. ज्या कालावधीमध्ये हे अनधिकृत बांधकाम झालेले आहे, त्या कालावधीतील संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासह अनधिकृत बांधकामे येत्या १५ दिवसांमध्ये तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.मुंबईमध्ये विविध ठिकाणी म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांवर हातोडा मारत कारवाई करण्याचे म्हाडाने ठरवले आहे. यासाठी सल्लागाराचीही लवकरच नेम्मणूक होणार आहे. म्हाडाने जर म्हाडा वसाहतींमध्ये बेकायदेशीर वास्तव करणाऱ्यांवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई केली तर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मोठ्या प्रमाणावर घरे मिळणार आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाल्याने या वसाहतींच्या पुनर्विकासात अनधिकृत बांधकामांचा खोडा होत आहे़ परिणामी पुनर्विकासाचे काम रखडले आहे. मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे येथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईपासून सुरूवात करण्यात येणार असल्याचे म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :म्हाडा