सायनमधील अनधिकृत मंदिरावर कारवाई

By admin | Published: November 18, 2016 04:29 AM2016-11-18T04:29:03+5:302016-11-18T04:29:03+5:30

न्यायालयाच्या आदेशानंतर सायन कोळीवाडा येथील ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिरावर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली.

Action on unauthorized temple in Sion | सायनमधील अनधिकृत मंदिरावर कारवाई

सायनमधील अनधिकृत मंदिरावर कारवाई

Next

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर सायन कोळीवाडा येथील ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिरावर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. यावेळी काही रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला असता वडाळा टी.टी पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले.
सायन-कोळीवाडयातील प्रतिक्षा नगर येथे हे ५६ वर्ष जुने ओम शिवशक्ती मरियम्मन मंदिर होते. मंदिर जलवाहिनीवर उभारण्यात आले होते. तसेच पालिकेच्या दफ्तरी मंदिराची नोंद नव्हती. त्यामुळे हे मंदिर अनधिकृत असल्याने पंधरा दिवसापूर्वी पालिकेने मंदिर विश्वस्तांना मंदिर अनधिकृत असल्याची नोटीस बजावली होती. मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिर वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या एफ उत्तर विभागाकडून या ठिकाणी कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसरात भक्तांची जमवाजमव केली. परिणामी कारवाईवेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून वडाळा ट्रक टर्मिनस पोलीसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात महापालिकेने या अनधिकृत मंदिरावर हातोडा मारला. (प्रतिनिधी)

Web Title: Action on unauthorized temple in Sion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.