महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार; राहुल शेवाळेंचा इशारा

By मनोहर कुंभेजकर | Published: September 27, 2023 03:02 PM2023-09-27T15:02:34+5:302023-09-27T15:04:57+5:30

शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

Action will be taken against MPs of thackeray group who do not consider the whip of women's reservation; Rahul Shewale's warning | महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार; राहुल शेवाळेंचा इशारा

महिला आरक्षणाचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार; राहुल शेवाळेंचा इशारा

googlenewsNext

मुंबई : नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही कायदेशीर सल्ला घेत असून याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपल्या पत्रकार परिषदेत खासदार शेवाळे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदाना दरम्यान अनुपस्थित होते. लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोद पद खासदार भावना गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खासदार गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र उबाठा गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीपचे उल्लंघन केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या  विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयका विषयी मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते, ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार हे तर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत. महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक सभागृहात मांडण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखविल्याबद्दल खासदार शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.

Web Title: Action will be taken against MPs of thackeray group who do not consider the whip of women's reservation; Rahul Shewale's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.