मुरूड पॅरासेलिंग अपघात प्रकरणी कारवाई होणार - मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 02:19 AM2019-06-25T02:19:07+5:302019-06-25T02:19:21+5:30

मुरूड समुद्रकिनारी पॅरासेलिंग अपघातात झालेल्या एका मुलाच्या मृत्यूची चौकशी करून एक महिन्याच्या आत दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी विधानसभेत दिले.

Action will be taken against Murud Parasailing Accident - Madan Yerawar | मुरूड पॅरासेलिंग अपघात प्रकरणी कारवाई होणार - मदन येरावार

मुरूड पॅरासेलिंग अपघात प्रकरणी कारवाई होणार - मदन येरावार

Next

मुंबई : मुरूड समुद्रकिनारी पॅरासेलिंग अपघातात झालेल्या एका मुलाच्या मृत्यूची चौकशी करून एक महिन्याच्या आत दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी विधानसभेत दिले.
या प्रकरणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. जीप पॅरासेलिंग हा प्रकार अनधिकृत व बेकायदा असल्याने मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जीपद्वारे पॅरासेलिंग करणाºया मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.
मुरूड समुद्र किनाºयावर झालेल्या अपघातात पॅरासेलिंग करताना अचानक पॅराशुटचा दोर तुटल्याने कोसळून वेदांत पवार याचा मृत्यू झाला होता. तर त्याचे वडील जखमी झाले होते. राज्यातील पर्यटनस्थळांवर बेकायदेशीर पॅरासेलिंग करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.
महाराष्ट्र जलक्रीडा धोरण २०१५ मध्ये जीप पॅरासेलिंग हा प्रकार नाही. या धोरणात जीप पॅरासेलिंगला परवानगी देण्यात येत नाही. मुरुड समुद्र किनाºयावर अनधिकृत-बेकायदेशीर प्रकारे जीपद्वारे पॅरासेलिंग करणाºया मालकाच्या व कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील वरसोली, किहीम, नागाव, अलिबागसह अन्य १३ ठिकाणी, ठाणे जिल्ह्यातील वसई, मांडवा, रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, हर्णे, गणपतीपुळे आदी आठ ठिकाणी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या सर्व ठिकाणी आयोजित केल्या जाणाºया जलक्रीडा संदर्भातील नियंत्रण व अधिकार हे महाराष्ट्र मेराटाईम बोर्डाला दिले आहेत, अशी माहिती येरावार यांनी दिली.

Web Title: Action will be taken against Murud Parasailing Accident - Madan Yerawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.