लग्नात परवानगी न घेता डीजे वाजवाल, तर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 02:55 PM2023-12-05T14:55:07+5:302023-12-05T14:56:17+5:30

तुळशीचे लग्न झाल्याने आता लग्नसराईची धूम सुरू होणार आहे.

Action will be taken if DJ plays in wedding without permission | लग्नात परवानगी न घेता डीजे वाजवाल, तर होणार कारवाई

लग्नात परवानगी न घेता डीजे वाजवाल, तर होणार कारवाई

मुंबई:

तुळशीचे लग्न झाल्याने आता लग्नसराईची धूम सुरू होणार आहे. लग्नात परवानगी न घेता डीजे वाजविल्यास कारवाई केली जाते. त्यामुळे तुम्हीही लग्नात परवानगी न घेता डीजे वाजविल्यास तुमच्यावरही कारवाई होवू शकते.   

डीजेचा आवाज किती?
पोलिसांनी काढलेल्या एका परिपत्रकात डीजेच्या आवाजाची पातळी ४० डेसिबलपेक्षा कमी ठेवण्याची सूचना केली होती. प्रत्यक्षात अनेक डीजे चालक ही मर्यादा सर्रास ओलांडतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होत आहे.

किती आवाजाला शहरात परवानगी?
काही डीजे चालक ७० ते १०० डेसिबलने गाणी वाजवत असल्याचे पोलिसांमार्फत समोर आले. लग्न समारंभादरम्यान परवानगी घेतल्याशिवाय डीजे वाजविल्यास थेट कारवाई होवू शकते.

..तर होतो गुन्हा दाखल 
पोलिसांची परवानगी न घेता डीजे वाजविल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यापूर्वीही पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हृदयरोग्यांना, लहान मुलांना त्रास
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तीव्र आवाजात डीजे वाजवणे अत्यंत चुकीचे आहे. दोन गाण्यांनंतर १५ ते २० मिनिटांची परवानगी घेणे आवश्यक असताना कर्कश आवाजाचा सतत मारा केला जातो. यामुळे कानांसह मेंदूलादेखील ईजा होण्याचा धोका अधिक असतो. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना तर हा आवाज सहन होण्यापलीकडे असल्याने त्यांचाही विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Action will be taken if DJ plays in wedding without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई