मुंबई: अनधिकृत पोस्टर, बॅनरबाजीमुळे मुंबईला बकाल आणि अस्वच्छतेचे स्वरूप प्राप्त होत असताना मुंबई पालिका पुन्हा एकदा या विरोधात ऍक्शन मोडवर आलिया आहे. नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही परवानगीशिवाय होर्डिंग्ज, पोस्ट , बॅनर लावल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असल्याचे ही प्रशासनानाने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर लावण्यास मनाई आहे. याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी गठित राज्यस्तरीय समितीची बैठक गृह विभागाचेअपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडली. मुंबईतील अनधिकृत होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर काढण्याची मोहीम पालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून वेळावेळी राबविण्यात येते, तसेच संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येते. तरीही नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी तसेच राजकीय पक्षांनी सार्वजनिक रस्ते, पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर तसेच पोस्टर लावू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच पालिकेच्याअधिकृत संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात फलकांची यादी नागरिकांकरीता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
कारवाईला वेग ?
या आधी अतिरिक्त आयुका अश्विनी जोशी यांनी घेतलेल्या आढाव बैठकीत ही अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांनाही नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पालिकेकडून याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील अनधिकृत पोस्टर , बॅनर , होर्डिग हटविण्याच्या या कारवाईला पुन्हा वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केल जात आहे.