तक्रारीत तथ्य आढळल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:14 AM2019-06-03T01:14:03+5:302019-06-03T01:14:13+5:30

मुंबई महापालिकेचे नवे अ‍ॅप : पावसाळापूर्व कामांची छायाचित्रे १२ जूनपर्यंत ‘अपलोड’ करण्याचे आदेश

Action will be taken on officers if complaints are found in the complaint | तक्रारीत तथ्य आढळल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

तक्रारीत तथ्य आढळल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील पावसाळापूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, पावसाळापूर्व कामांमध्ये मिठी नदीसह नालेसफाई, रस्तेविषयक कामांचा समावेश असून, ही कामे प्रगतिपथावर असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. यात अधिक तत्परता म्हणून महापालिकेच्या ‘एमसीजीएम २४ इनटू ७’ या अ‍ॅपमधील नागरी तक्रारींविषयीच्या विकसित ‘मॉड्यूल’मध्ये नालेसफाई व रस्तेविषयक पूर्ण झालेल्या पावसाळापूर्व कामांची छायाचित्रे १२ जूनपर्यंत ‘अपलोड’ करण्याचे आदेश विभागस्तरीय सहायक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, नागरिकांनी अपलोड केलेल्या छायाचित्रांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आल्यास, संबंधित अधिकाºयांवर महापालिकेच्या सेवा नियमावलीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिकेचे ‘एमसीजीएम २४ इनटू ७’ हे अ‍ॅप लोकाभिमुख करण्याचे आदेश दिले आहेत. सुरुवातीला या अ‍ॅपमध्ये नागरी तक्रारींविषयीचे ‘मॉड्यूल’ विकसित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक तक्रारीसोबत तक्रारीशी संबंधित छायाचित्रे ‘अपलोड’ करण्याची सुविधा विकसित करण्याचे सांगण्यात आले आहे. तक्रार व छायाचित्र हे ‘जागतिक स्थितीमापक प्रणाली’ म्हणजे ‘ग्लोबल पोझिशनिंग सीस्टिम’ यास जोडलेले असणार आहे. परिणामी, तक्रारी ज्याबाबत आहेत, त्याविषयीचे निश्चित ठिकाण शोधणे सोपे होणार आहे. विकसित करण्यात येणाºया मॉड्यूलमध्ये नालेसफाई व रस्तेविषयक पूर्ण झालेल्या पावसाळापूर्व कामांची छायाचित्रे १२ जून, २०१९ पर्यंत ‘अपलोड’ करण्याचे आदेश विभागस्तरीय सहायक आयुक्त व संबंधित अधिकाºयांना देण्यात आले आहेत. यानुसार, अपलोड झालेल्या छायाचित्रांमध्ये व सदर ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचे जाणवल्यास, नागरिक आपल्या मोबाइलवरून प्रत्यक्ष परिस्थितीची छायाचित्रे अपलोड करू शकणार आहेत.

नालेसफाई अंतिम टप्प्यात
महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे वेगात सुरू असून, ती आता अंतिम टप्प्यात आहेत.
ही कामे निर्धारित वेळापत्रकानुसारच गुणवत्तापूर्ण पद्धतीने करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
साफसफाई करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये काही परिसरात कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

वाहणाºया नाल्याच्या कडेला जाळी व फ्लोटिंग ब्रूम बसविण्यासह लोकांना कचरा न टाकण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे, शिवाय नगरसेवकांची मदत घेऊन जनप्रबोधन करण्यात येत आहे. विनंती करूनही कचरा टाकला जात असेल, तर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंडात्मक कारवाई करून प्रतिसाद मिळत नसल्यास संबंधित परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

धोकादायक इमारती
जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींची पाहणी करण्यात येते. पाहणीनुसार इमारतींचे वर्गीकरण करण्यात येते.
सी-१ : अति धोकादायक, राहण्या अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे प्रवर्गामध्ये मोडणाºया इमारती.
सी-२ ए : इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाºया इमारती.
सी-२ बी : इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाºया इमारती.
सी-३ : इमारतीची किरकोळ दुरुस्ती प्रवर्गामध्ये मोडणाºया इमारती

Web Title: Action will be taken on officers if complaints are found in the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.