फुकट्या प्रवाशांवर कारवाई॒; मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 70.32 टक्क्यांनी वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 03:33 PM2019-11-12T15:33:28+5:302019-11-12T15:33:34+5:30

मध्‍य रेल्वे द्वारा विना तिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्यांविरूध्‍द मोहीम राबविण्यात आली होती.

Action on without ticket passengers; Central Railway's revenue increased by 70.32% | फुकट्या प्रवाशांवर कारवाई॒; मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 70.32 टक्क्यांनी वाढ 

फुकट्या प्रवाशांवर कारवाई॒; मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 70.32 टक्क्यांनी वाढ 

googlenewsNext

मुंबई॒: मध्‍य रेल्वे द्वारा विना तिकीट तसेच अनियमित प्रवास करणाऱ्यांविरूध्‍द मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी तसेच विना तिकीट केल्या जाणाऱ्या प्रवासाला प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येतात. यासाठी मध्‍य  रेल्वे द्वारा नियमित स्वरूपात अभिनव पावलं उचलली जातात.  

वरिष्‍ठ अधिका-यांकडून विना तिकीट प्रवासामुळे होणा-या राजस्‍व हानि तसेच अन्‍य अनियमिततेवर सूक्ष्म लक्ष  ठेवले जाते. 
मध्य रेल्वेने ऑक्टोबर 2019 या महिन्यात, 22.87 कोटी रुपये तिकीट तपासणीतून मिळविले आहेत. मागील वर्षीच्या ऑक्टोबर 2018  मधील 13.42 कोटी रुपयांच्या तुलनेत यायोगे 70.32% वाढ झाली आहे. 

ऑक्टोबर 2019 महिन्यात, विना तिकीट/अनियमित प्रवासाचे 4.25 लाख प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2018 मध्ये 2.80 लाख प्रकरणांची नोंद झाली होती,  अशा प्रकारे एक महिन्याच्या कालावधीत यावर्षी या  प्रकारच्या प्रकरणांत 51.84% वाढ झाली आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत विना तिकीट / अनियमित प्रवास आणि अन-बुक केलेल्या सामानांचे एकूण 24.04 लाख प्रकरणांची नोंद झाली आहे.  मागीलवर्षी याच कालावधीत 20.81 लाख प्रकरणांची नोंद झाली होती अशा प्रकारे यामध्ये 15.54% ची वाढ झाली आहे.  

एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत विना तिकीट/ अनियमित प्रवासामुळे  126.67 कोटी रुपये उत्पन्नाची नोंद झाली. मागील वर्षी याच कालावधीतील अशाच प्रकारच्या 103.77 कोटी रूपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत 22.07% वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2019 महिन्यात  आरक्षित प्रवाशी तिकीटांच्या  हस्तांतरणाची  695 प्रकरणे नोंदविण्यात आली आणि 5.60 लाख रुपये दंड स्वरूपात वसूल केले गेले.

दिवाळी आणि छठ पूजेच्या सणांच्या दरम्यान आयोजित विशेष तिकीट तपासणी मोहीमेमुळे  अनियमित प्रवासाला प्रतिबंध करण्यासाठी मदत झाली आहे आणि अशा प्रकारच्या प्रकरणांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे आणि दंडाच्या स्वरुपात राजस्वात वाढ झाली आहे.  

21.10.2019 ते 01.11.2019 या कालावधीत 13.94 कोटी रुपये उत्पन्न  तिकीट तपासणीतून मिळाले आहे जे मागील वर्षीच्या 1.11.2018 से 12.11.2018 या कालावधीतील  11.68 कोटी रुपयांच्या  तुलनेत  19.37% अधिक आहे. सदरचे उत्पन्न 2019 मधील 2,40,754 प्रकरणांतून नोंद झाले जे 2018 मधील याच कालावधीतील 1,99,812  प्रकरणांच्या तुलनेत 20.49% वाढलेले आहे.

Web Title: Action on without ticket passengers; Central Railway's revenue increased by 70.32%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.