कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम

By admin | Published: November 5, 2014 10:00 PM2014-11-05T22:00:10+5:302014-11-05T22:00:10+5:30

या उपक्रमातून उघड्यावरील कचऱ्याचे निर्मूलन तर झालेच पण त्यातून गावाचे सौंदर्य अधिक खुलविणा-या सुंदर कोपरा बागा निर्माण झाल्या

Activities for waste management | कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम

कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम

Next

गोरेगाव : घनकचरा व्यवस्थापन ही गावची समस्या, यावर कायमस्वरूपी लोकसहभागातून उपाययोजना करण्यासाठी कोपरा बाग हा उपक्रम स्तुत्य असून यात ग्रामस्थांनी सातत्य ठेवावे व याचा आदर्श इतर गावांनी घेवून गोरेगाव कोपरा बाग हा रायगड पॅटर्न ठरावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले.
या उपक्रमातून उघड्यावरील कचऱ्याचे निर्मूलन तर झालेच पण त्यातून गावाचे सौंदर्य अधिक खुलविणा-या सुंदर कोपरा बागा निर्माण झाल्या. या सुंदर बगिचाची जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी नुकतीच पाहणी केली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, पी.एम. साळुंखे यांच्यासह भेट दिली. (वार्ताहर)

Web Title: Activities for waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.