अभिनेता अश्रफूल हकचे निधन
By admin | Published: February 18, 2015 02:19 AM2015-02-18T02:19:03+5:302015-02-18T02:19:03+5:30
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अल्पावधितच आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता अश्रफूल हकचे मंगळवारी सकाळी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ४५ वर्षाचे होते.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अल्पावधितच आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता अश्रफूल हकचे मंगळवारी सकाळी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ४५ वर्षाचे होते.
त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने बॉलिवूड आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. नॅशनल स्कूल आॅफ ड्रामातून पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्रफूल बॉलिवूडमध्ये नशिब आजमवण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांनी अल्पावधीतच जंगल, ब्लॅक फ्रायडे, फुकरे, दिवार, पानसिंग तोमर अशा सुमारे ३० चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना बोन मॅरोशी संबंधित असाध्य आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार स्ुरू होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते अंधेरीत पत्नीसोबत राहत होते.