Join us

अभिनेता अतुल अभ्यंकर कालवश

By admin | Published: November 13, 2014 1:14 AM

नाटक आणि मालिका या क्षेत्रत अभिनयाचा ठसा उमटविलेला अभिनेता अतुल अभ्यंकर (42) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुंबई : नाटक आणि मालिका या क्षेत्रत अभिनयाचा ठसा उमटविलेला अभिनेता अतुल अभ्यंकर (42) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छोटय़ा पडद्यावरील ‘जय मल्हार’ या सध्या सुरू असलेल्या मालिकेत ‘प्रधान’ ही अतुल यांची भूमिका गाजत असतानाच त्यांच्या अकाली जाण्याने मनोरंजन क्षेत्रला धक्का बसला आहे.
अतुलच्या पश्चात पत्नी राखी व आई असा परिवार आहे. बुधवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मी नथुराम गोडसे बोलतोय, डेथ ऑफ अ कॉन्करर, हा सागरी किनारा, वात्रट मेले, केशवा माधवा अशी नाटके तसेच आंबट गोड, तू तिथे मी अशा मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. (प्रतिनिधी)
 
अतुल आपल्यातून गेला हे खरेच वाटत नाही. माङया ‘वात्रट मेले’ या नाटकाचे त्याने हजार प्रयोग केले होते. तेव्हा तो उमेदवारी करीत होता. अतुल खूप धडपडय़ा आणि गुणी अभिनेता होता. आता आता कुठे त्याला चांगले यश मिळत होते. 
- गंगाराम गवाणकर, नाटककार
 
अतुलची बातमी अतिशय धक्कादायक आहे. या बातमीवर विश्वास बसत नाही.
- आशालता वाबगावकर, 
ज्येष्ठ अभिनेत्री
 
अतुलचे व्यक्तिमत्त्व साधे होते. पण तो उच्च दर्जाचा अभिनेता होता. त्याचे पाय मात्र कायम जमिनीवर होते. त्याचे जाणो धक्का देणारे आहे.
- वैशाली बांदोरकर, अभिनेत्री
 
मराठी नाटय़सृष्टी व मालिका विश्वातील तरुण अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे अकाली निधन मनाला चटका लावून गेले.  अभ्यंकर उत्कृष्ट अभिनय करायचेच, पण त्यांचे गायनही उत्तम होते. अशा हरहुन्नरी कलावंताच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह मराठी मनोरंजनविश्वाला धक्का बसला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 
 
हळवा आणि सहृदयी असा अतुल उत्तम अभिनेता होता. तो धडपडय़ा नट होता. ‘जय मल्हार’ मालिकेतून आता कु ठे तो नावारूपाला येत होता. एखाद्या माणसाच्या करिअरचा उत्कर्षबिंदू यावा आणि नियतीने असे फासे टाकावेत, हे दुर्दैवी आहे. 
- विजय गोखले, 
अभिनेता, दिग्दर्शक