Join us

अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे दीर्घ आजाराने निधन

By admin | Published: January 02, 2017 6:57 AM

मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर एक काळ गाजवणाऱ्या आणि जाहिरात, मालिका व सिनेक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर

मुंबई : मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर एक काळ गाजवणाऱ्या आणि जाहिरात, मालिका व सिनेक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर (८२) यांचे दीर्घ आजारानंतर शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात अभिनेता यतीन कार्येकर यांच्यासह डॉ.प्रफुल्ल व डॉ.चेतन हे मुलगे आहेत. रविवारी दुपारी आंबोली येथील स्मशानभूमीत ज्योत्स्ना कार्येकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गेली तीन वर्षे अल्झायमरशी त्या सामना करत होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ‘माणूस नावाचे बेट’, ‘आधेअधुरे’, ‘काचेचा चंद्र’ अशा नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. अनेक जाहिरातींच्या माध्यमातून त्या घराघरांत पोहोचल्या होत्या. ‘अहो ऐकलंत का’, ‘शांती’, ‘तीन बहुरानीया’ अशा मालिकांतूनही त्यांचे रसिकांना दर्शन घडले होते. ‘कथा’, ‘सत्या’, ‘कहानी घर घर की’, ‘जोश’ आदी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या होत्या. अभिनय क्षेत्रातील कामेरकर भगिनींपैकी त्या एक होत्या. (प्रतिनिधी)