हृदयविकारामुळे 'रईस' अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 11:36 AM2018-03-14T11:36:34+5:302018-03-14T11:36:34+5:30

बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Actor Narendra Jha passes away at the age of 55, after a cardiac arrest | हृदयविकारामुळे 'रईस' अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन

हृदयविकारामुळे 'रईस' अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन

Next

मुंबई - बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला होता. वाडा येथील फार्म हाऊसवर असताना त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.  नरेंद्र झा हे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवारासोबत आपल्या फार्म हाऊसवर गेलेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.  नरेंद्र झा यांनी 'शांति', 'छूना है आसमान', 'एक घर बनाऊंगा' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त 'अधूरी कहानी', 'घायल वन्स अगेन', मोहनजो दाड़ो', 'शोरगुल', 'काबिल', 'हैदर' यांसारख्या सिनेमांमध्येही ते झळकले आहेत.



 

'रईस' सिनेमामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या निमित्तानं सीएनएक्स लोकमतने नरेंद्र झा यांच्यासोबत खास संवाद साधला होता....
: मुलाखकार - सुवर्णा जैन
- सिनेमा स्वीकारताना कोणत्या गोष्टींचा विचार करतोस ?
सिनेमा साईन करण्यापूर्वी सिनेमा कोण बनवत आहे, सिनेमातील भूमिका आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिनेमाची कथा कशी असणार या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. या सगळ्या गोष्टींचे समाधान झाले की सिनेमा स्वीकारतो. सिनेमात कलाकार जीव ओतून काम करत असेल आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचलीच नाही असे होण्यापेक्षा आपले काम रसिकांना कितपत आवडेल याचा नेहमी विचार करतो. 

- आजवर साकारलेल्या कोणत्या भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत ?
आतापर्यंत विविध प्रकारचे सिनेमा आणि विविध शेड असलेल्या भूमिका साकारल्या. 'हैदर' सिनेमातील डॉ. मीर हिलाल ही भूमिका मला चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देते. त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका सगळ्यात आवडती आहे. या व्यतिरिक्त काबील, श्याम बेनेगल यांच्या सिनेमात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि संविधानमध्ये साकारलेली मोहम्मद जिना ही भूमिका माझ्या कायम लक्षात राहिल. 

- तू आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. काही निगेटिव्ह तर  काही पॉझिटिव्ह. वैयक्तीक कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात ?
कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकाराची एक आवड असतेच. कुणाला निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिका आवडतात, तर कुणाला पॉझिटिव्ह. मलाही पॉझिटिव्ह भूमिका करायला आवडतात. निगेटिव्ह भूमिका सुद्धा साकारल्या आहेत. 'रईस' सिनेमातील भूमिकेलाही निगेटिव्ह शेड आहे. आजपर्यंत कामात कोणताही चॉईस ठेवला नाही. कारण कामे आपल्या चॉईसनुसार मिळत नाही. 

- सिनेमामध्ये कामं मिळतायेत. तर मालिकांमध्ये काम करण्याच्या काही ऑफर्स आल्या आहेत का ?
सध्या देवाच्या कृपेने चांगल्या भूमिका मिळत आहेत. मालिकांसाठी ब-याचदा विचारणा झाली आहे. मात्र सिनेमाच्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमुळे मालिकांसाठी वेळ देणे खूप कठीण जाते. दुसरी गोष्ट मालिकांमध्ये कथानकानुसारही कलाकारांचे शेड्युअल ठरते. कलाकार शूट करण्यासाठी 20 दिवस देतो. काही कारणास्तव ते शूट लांबणीवर पडते. या सगळ्यांना तांत्रिक गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. त्यामुळे सध्या जेवढे दिवस शक्य तेवढे सिनेमातच बिझी राहायचे ठरवले आहे. भविष्यात चांगली संधी आल्यास नक्की विचार करेन 

- पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे ? याविषयी तुझे काय मत आहे ?
आपल्या देशाप्रती प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी असते. भारतीयांच्या भावनांचा आदर करणे हेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. मात्र सध्या जे सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहेत त्यांना मंजुरी देण्यात यावी. कारण या सगळ्या गोष्टी पुन्हा रि-शूट करणे म्हणजे प्रचंड मेहनत आणि खर्चिक बाब असते. सिनेमाला बनवताना लागणारे बजेट मोठे असते. त्यामुळे बनलेल्या सिनेमांचा विचार करुन त्यांना हिरवा कंदील देण्यास हरकत नाही. मात्र आगामी सिनेमात पाकिस्तानी कलाकार नसतील याची काळजी घेतली जाईल असे वाटते. कारण एक्शन झाली की रिएक्शन होतेच. 
 

Web Title: Actor Narendra Jha passes away at the age of 55, after a cardiac arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.