अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल, कोरोना टेस्ट निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 10:09 PM2020-08-08T22:09:14+5:302020-08-08T22:12:11+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आता बॉलिवूड मंडळी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे.

Actor Sanjay Dutt Lilavati admitted to hospital, corona test negative | अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल, कोरोना टेस्ट निगेटिव्ह

अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल, कोरोना टेस्ट निगेटिव्ह

googlenewsNext

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच, संजय दत्तची कोरोना रॅपिड चाचणी करण्यात आली आहे. मात्र, ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे. 


सध्या संजय दत्तची प्रकृती स्थिर आहे. त्याला उद्या सुद्धा डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. दरम्यान, संजय दत्तची पत्नी मान्यता आपल्या मुलगा शहरान आणि इकरा यांच्यासोबत दुबईत आहे. लॉकडाऊनमुळे  मान्यता दुबईहून मुंबईला परतली नाही. त्यामुळे संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांपासून लांब आहे. त्याने कुटुंबासमवेत सोशल मीडियावर फोटो अपलोड करून आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने पत्नी मान्यता हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आता बॉलिवूड मंडळी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्याने ट्विट करून ही माहिती दिली. बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. ऐश्वर्या आणि आराध्य यांनी सर्वप्रथम कोरोनावर मात केली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि ते घरी परतले. आज अभिषेकचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला. 
 

Read in English

Web Title: Actor Sanjay Dutt Lilavati admitted to hospital, corona test negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.