मराठी भाषा दिनी अभिनेता सुनील बर्वेंनी केले पालिका कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध
By मनोहर कुंभेजकर | Published: February 28, 2023 11:45 AM2023-02-28T11:45:35+5:302023-02-28T11:46:14+5:30
अभिनेता सुनील बर्वे यांनी कुसुमाग्रजांच्या कविताचं वाचन करून पी दक्षिण वॉर्डच्या कर्मचारी वर्गाला केले मंत्रमुग्ध
मुंबई - पालिकेच्या पी दक्षिण वॉर्डमध्ये काल मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मराठी नाट्य तथा चित्रपट अभिनेता सुनील बर्वे आवर्जून उपस्थित होते.त्यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविताचं वाचन करून सर्व कर्मचारी वर्गाला मंत्रमुग्ध केले. तर अश्या प्रकारचा कार्यक्रम पी दक्षिण विभागात प्रथमच झाल्याने सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग तर खूपच आनंदी होते.
तसेच सदर कार्यक्रमाला पी दक्षिण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरुवात कार्यालयातील कर्मचारी बंधू भगिनींनी सादर केलेल्या संत ज्ञानेश्वर रचित पसायदानने झाली. तर अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपलं मराठी भाषेबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करताना अनेक कविता आणि विडंबन काव्य सादर केल्या.तर मराठी पण जपणाऱ्या येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे त्यांनी कौतूक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पी दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आपले, कविवर्य कुसुमाग्रजांच्या सोबत असेललं नात आणि त्यांचा मिळालेला सहवास याबद्दल सांगून, त्यांना कविवर्य कुसुमाग्रजांच्या आपल्या वर असलेल्या संस्काराबद्दल आठवणींना उजाळा दिला. निदान आज तरी सर्वांनी फक्त आणि फक्त मराठीच बोलावे असा आग्रह करत अक्रे यांनी एकही इतर भाषिक शब्द न वापरत फक्त आणि फक्त मराठीत भाषण केले.