अभिनेत्रीला मारहाण, व्यावसायिकाचा इन्कार
By admin | Published: December 14, 2014 12:46 AM2014-12-14T00:46:01+5:302014-12-14T00:46:01+5:30
अभिनेत्री योगिता दांडेकर हिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना जुहू येथे घडली आहे.
Next
मुंबई : अभिनेत्री योगिता दांडेकर हिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना जुहू येथे घडली आहे. मात्र याचा आरोप असलेले व्यावसायिक विमल हंसराज सुराणा यांनी या घटनेचा इन्कार केला असून आपण
निदरेष असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दांडेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दांडेकर या सिद्धिविनायक मंदिराकडून त्यांच्या वाहनाने निघाल्या होत्या. त्यावेळी सुराणा या मार्गावरून जात होते. तेथे त्यांचा चालक कृष्णकुमार वैद्यनाथ याच्यासोबत वाद झाल्यानंतर या दोघांनी मिळून मारहाण केली. दहा मिनिटे ही मारहाण सुरू होती. तेथे जमलेल्या जमावापैकी कोणीही मदतीला आले नाही. नंतर पोलिसांत विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात
आली. दांडेकर यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भादंविच्या कलम 354, 323, 504, 34 अन्वये सुराणा आणि त्यांच्या वाहनचालकाला अटक केली.
मात्र सुराणा यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. दांडेकर या वाहन चालवताना मोबाइलवर बोलत होत्या. त्यांच्याच कारने माङया गाडीला मागून ठोकर दिली. तरीही दांडेकर यांनी माङया चालकाला धमकावले. त्या वेळी मध्यस्थी करून त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला. बहेनजी शांत हो जाईए, असेही मी त्यांना म्हणालो. पण त्यांनी माझी कॉलर पकडून मलादेखील धमकावले.
अखेर तेथे जमाव झाल्याने पोलिसांनी आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावले. तेथे पोलिसांनी माङो म्हणणो न ऐकताच विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. हे अतिशय गैर असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सुराणा यांनी केली आहे. अॅड. महेश वासवानी यांच्यामार्फत सुराणा यांनी हा दावा केला आहे. (प्रतिनिधी)