Join us

Tunisha Sharma: “तुनिषाचा श्वास सुरु होता, ५ मिनिटांवर हॉस्पिटल होते, तिथे का नेले नाही?”; आईने केली विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 11:50 AM

Tunisha Sharma: तुनिषा शर्माला जवळच्या हॉस्पिटलला नेले असते, तर तिला वाचवता आले असते, असे वनिता शर्मा यांनी म्हटले आहे.

Tunisha Sharma: छोट्या पडद्यावरील कार्यक्रम 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'ची राजकुमारी मरियम म्हणजेच अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. तुनिषा शर्माची आई वनिता यांनी शिजान खानवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. यातच आता तुनिषाचा श्वास सुरु होता, ५ मिनिटांवर हॉस्पिटल होते, तिथे का नेले नाही, असा प्रश्न आईने उपस्थित केला आहे. 

तुनिषा शर्माला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिचा प्रियकर शिजान खान पोलीस कोठडीत आहे. तुनिषाला वाचवले जाऊ शकले असते. तिला जवळ असलेल्या हॉस्पिटलला न्यायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त करत शिजान खानवर सडकून टीका केली. तुनिषाला जवळच्या हॉस्पिटलला न्यायचे सोडून दूर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलला का नेले, अशी विचारणा वनिता शर्मा यांनी केली. 

ती हत्या असू शकते...

ती आत्महत्या किंवा हत्या असू शकते. मी हे म्हणतोय कारण शीजन तिला दूर अंतरावर असलेल्या हॉस्पिटलला घेऊन गेला होता. सेटपासून ५ मिनिटांच्या अंतरावरही हॉस्पिटल होते. मात्र, असे असतानाही तो तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला नाही? तिचा श्वास सुरू होता तिला वाचवता आले असते, असे वनिता शर्मा यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शिजान खानवर गंभीर आरोप केले आहेत. वनिता यांनी शिजानवर तुनिषाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तुनिषाच्या आईने खुलासा केला की, ब्रेकअपच्या दिवशी शिजानने तुनिषाला थप्पड मारली होती. 

दरम्यान, शिजान खान ड्रग्ज सेवन करायचा. मात्र, तो अमली पदार्थ कधीपासून घेत होता, याची माहिती नाही. एवढेच नाही तर तुनिशाचे मामा पवन शर्माप्रमाणेच आता आईनेही शिजानला भेटल्यानंतर तुनिषाची जीवनशैली बदलल्याचे सांगितले आहे. तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती आणि शिजान तिला उर्दू शिकवत होता. मुलीच्या मृत्यूनंतर शिजानने तिला मदत केली नाही, असे आरोप करण्यात आले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :तुनिशा शर्मा