Join us

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ग्रंथदान; ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागाला १०० पुस्तके भेट

By मनोहर कुंभेजकर | Published: October 13, 2023 7:30 PM

त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम  अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त  मृणाल कुलकर्णी  यांनी ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागाकडे आज १०० पुस्तके भेट दिली.  ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागाचे मुख्य समन्वयक डॉ महेश अभ्यंकर यांना अंधेरी पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानी येथे ही पुस्तके भेट दिली तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारी ही योजना महाराष्ट्र भर विस्तार झपाट्याने वाढत असल्यामुळे त्याचे कौतुक त्यांनी केले. या योजने मुळे मराठी वाचकांना त्यांच्या घरी पुस्तक विनासायास मिळत असल्यामुळे नक्कीच मराठी वाचक वाढवण्यास मदत होतील त्यासाठी त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी ग्रंथ तुमच्या दारी, मुंबई विभागाची जोमाने वाटचाल सुरु असून मुंबईत १७०  ग्रंथ पेटी असून १० हजार वाचक या उपक्रमास जोडले गेले आहेत."वाचनाने शब्द सामर्थ वाढते, उत्तम संवाद साधण्याची  कला संपादित होते. आणि आपला सर्वांगीण विकास होतो" अशी माहिती  डॉ. महेश अभ्यंकर यांनी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना दिली.तसेच त्यांनी लिहीलेले इमोझिल पुस्तक त्यांना भेट दिले. 

टॅग्स :मुंबई