मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मॉडेल महिलेने राखी सावंत विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या मॉडेलचे काही फोटो आणि व्हिडीओज व्हायरल केले आहेत, असा आरोप त्या मॉडेलने केला आहे.
मॉडेल महिलेने केलेल्या तक्रारीची दखल घेत अंबोली पोलिसांनी राखी सावंत हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काही दिवसापूर्वी राखी सावंतने महिला मॉडेलचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले होते. या आरोपाखील राखी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी राखी सावंतला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते.
Kajol : अजय देवगणसोबत लग्न होण्याआधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती काजोल
या प्रकरणात राखी सावंतवर कारवाई होऊ शकते. पोस्ट व्हायरल करण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरले असल्याचा आरोप यात केला आहे, तर या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे, कोणी फोटो,व्हिडीओ पुरवले या संदर्भात पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, अंबोली पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत.
तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. राखीने तिने पत्रकार परिषदेदरम्यान मॉडेल चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली, असा आरोप केला आहे.
राखी सावंतने आदिलसोबत लग्न केल्याच्या चर्चा सुरू आहेत. आदिल खानसोबतच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यानंतर राखी सावंत अलीकडेच चर्चेत राहिली. यानंतर राखीने खुलासा केला. तिने मागच्या वर्षी आदिलसोबत लग्न केले होते. तिने लग्नाच्या प्रमाणपत्राचे फोटो शेअर केले ज्यामध्ये 29 मे 2022 रोजी लग्न झाल्याचे दिसून येते.