पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:14+5:302021-07-24T04:06:14+5:30
शिल्पा शेट्टीच्या बँक खात्याचीही होणार चौकशी पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला... शिल्पा शेट्टीच्या बँक खात्याचीही होणार चौकशी ...
शिल्पा शेट्टीच्या बँक खात्याचीही होणार चौकशी
पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला...
शिल्पा शेट्टीच्या बँक खात्याचीही होणार चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात गुन्हे शाखेकड़ून झाडाझडती सुरु होती. गुन्हे शाखेकड़ून तिचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. या वृत्ताला गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच तिच्या बँक खात्याचीही लवकरच चौकशी होणार असल्याचेही समजते आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणातील एका कंपनीत शिल्पा शेट्टीचीही भागीदारी होती. मात्र २०२० मध्ये तिने या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. तसेच या कंपनीतून आतापर्यंत किती जणांनी आणि कुठल्या कारणांमुळे राजीनामा दिला याबाबत संबंधितांकडे चौकशी करत जबाब नोंदविण्यात येत आहे.
राज कुंद्रा यांच्या कार्यालयातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण दस्तऐवजानंतर, शुक्रवारी शिल्पा शेट्टी यांच्या जुहू येथील घरी गुन्हे शाखेने झाडाझडती सुरू केली. याचदरम्यान शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. या पोर्नोग्राफीबाबत त्यांना काही माहिती होते का? यासह विविध प्रश्नांबाबत शेट्टी यांच्याकडे विचारणा करण्यात आली.
पोर्नोग्राफीतील पैसे शिल्पा शेट्टी यांच्याही बँक खात्यात गेले आहेत का, हे शोधण्यासाठी त्यांची बँक खाती तपासण्यात येणार आहे. तसेच कुंद्रा यांच्यासोबत कुठल्या कंपनीत त्यांची भागीदारी आहे का, याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
.