कौटुुंबिक हिंसाचारात अडकल्या अभिनेत्री

By admin | Published: March 18, 2015 01:12 AM2015-03-18T01:12:49+5:302015-03-18T01:12:49+5:30

शारीरिक आणि मानसिक स्तरावर कुटुंबाकडून हिंसाचार होताना अनेक वेळा पाहायला मिळत असला, तरी त्यात प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकल्या जात आहेत.

Actress Stuck In Family Violence | कौटुुंबिक हिंसाचारात अडकल्या अभिनेत्री

कौटुुंबिक हिंसाचारात अडकल्या अभिनेत्री

Next

अनुज अलंकार ल्ल मुंबई
अभिनेत्री रती अग्निहोत्रीने दोन दिवसांपूवी पती अनिल वीरवानीने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. शारीरिक आणि मानसिक स्तरावर कुटुंबाकडून हिंसाचार होताना अनेक वेळा पाहायला मिळत असला, तरी त्यात प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकल्या जात आहेत. रतीने कौटुंबिक हिंसाचाराच्या नोंदवलेल्या तक्रारीनंतर अनेकांना आश्चर्य वाटले होते. मात्र अशाप्रकारे कौटुंबिक हिंसाचारात मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक अभिनेत्री भरडल्या गेल्याचे वास्तव आहे. मात्र यातील अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचली, तर काही पोहोचली नाहीत.
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात गेल्या वर्षी युक्ता मुखीने पती प्रिन्स तुलीविरोधात तक्रार दिली होती. लग्नाआधी दोघांनी दोन वर्षे एकत्र घालवली होती. पण वर्षभरातच युक्ताने तक्रार करीत प्रिन्सपासून घटस्फोटही घेतला. सध्या मुंबईत राहत असलेल्या गायक अदनान सामीच्या पत्नी सबाहनेही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तर संगीतकार इस्माईल दरबारची बायको फरजानाने २००४ साली इस्माईलविरोधात अशीच तक्रार दाखल केली होती. गायिका सुनिधी चौहानने नृत्य दिग्दर्शक बॉबी खानबरोबर प्रेमविवाह केला. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात तीव्र मतभेद झाल्यानंतर तिने पोलीस स्थानकात बॉबीने मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर दोघे वेगळे झाले. काहीच दिवसांपूर्वी तिने दुसरे लग्न केले.
काही वर्षांपूर्वी बोल्ड अभिनेत्री झीनत अमाननेही पती संजय खान (सुझन खानचे वडील)वर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ते दोघे विभक्त झाले. झीनतने नंतर मझहर खानबरोबर दुसरा विवाह केला. मात्र हा विवाहही फार काळ टिकला नाही. त्यामागाचे कारणही कौटुंबिक हिंसाचार हेच होते. रेखाच्या आयुष्यात राज बब्बरनेही काही काळ राज्य केले होते. एक दिवस भररात्री रेखाला राजच्या घरातून रडत जाताना पाहण्यात आले. त्या वेळी राजने रेखावर हात उगारला, अशी चर्चा होती. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही. अशाच प्रकारच्या चर्चा ऋषी कपूर - नीतू सिंग आणि राजेश खन्ना-डिंपल कपाडिया यांच्याबाबतीतही ऐकायला मिळाल्या. पण यापैकी कोणीही पोलिसांत तक्रार केली नाही.
फक्त लग्नसंबंधातच नव्हे, तर अनेक प्रेमप्रकरणांमध्येही अभिनेत्रींना मारहाण झाल्याची प्रकरणे आहेत. मात्र यात सलमान खानचे नाव सर्वात जास्त चर्चेत असते. त्याची पहिली गर्लफ्रेंड सोमी अलीपासून ते ऐश्वर्या रायपर्यंत सगळ््यांनाच त्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. शाहरूख खानच्या चित्रपटाच्या सेटवरही सलमानने ऐश्वर्याला मारहाण केली होती. तर आदित्य पांचोली आणि कंगना राणावत यांच्या वादाचे कारणही आदित्यने केलेली मारहाण हेच होते.
नुसते चित्रपटच नाही, तर मालिकेतल्या अभिनेत्रीही मोठ्या प्रमाणात कौटुंबिक हिंसाचारात बळी पडल्या आहेत. लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने पती राजा चौधरीविरोधात शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. यात राजामुळे तिला खूप भोगावे लागत असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र राजाच्या अशा वागण्याला कंटाळून तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. गेल्याच वर्षी तिने दुसरे लग्नही केले.
दिवंगत प्रमोद महाजनचा मुलगा आणि सेलीब्रिटी राहुल महाजनची दोन्हीही लग्ने कौटुंबिक हिंसाचारामुळे तुटली. पहिल्या लग्नात तर श्वेता सिंहने मारहाणीचा आरोप करून घटस्फोट घेतला. तर दुसऱ्या लग्नानंतरही काही महिन्यांमध्येच डिंपीनेही त्याच्यावर असाच आरोप केला. गेल्याच आठवड्यात त्या दोघांत घटस्फोट झाला.

Web Title: Actress Stuck In Family Violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.