लंडनमध्ये ‘आज्जी’चा गौरव! अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 04:24 PM2018-03-27T16:24:37+5:302018-03-27T16:24:37+5:30

व्हय, मी सावित्रीबाई, द मदर, द घरवाली यासारख्या मराठी-हिंदी कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणा-या, रंगभूमीच्या माध्यमातून स्त्री हक्कांचा, महिला सक्षमीकरणाचा जागर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य लेखिका सुषमा देशपांडे यांचा लंडन येथे नुकत्याच झालेल्या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला. ‘आज्जी’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल सुषमा देशपांडे यांना गौरविण्यात आले.

Actress Sushma Deshpande conferred the award | लंडनमध्ये ‘आज्जी’चा गौरव! अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना पुरस्कार

लंडनमध्ये ‘आज्जी’चा गौरव! अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना पुरस्कार

googlenewsNext

 मुंबई -  व्हय, मी सावित्रीबाई, द मदर, द घरवाली यासारख्या मराठी-हिंदी कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणा-या, रंगभूमीच्या माध्यमातून स्त्री हक्कांचा, महिला सक्षमीकरणाचा जागर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य लेखिका सुषमा देशपांडे यांचा लंडन येथे नुकत्याच झालेल्या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला. ‘आज्जी’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल सुषमा देशपांडे यांना गौरविण्यात आले.

लंडन येथे शनिवारी झालेल्या ‘यूके आशियाई चित्रपट महोत्सवा’मध्ये सुषमा देशपांडे यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मान करण्यात
आला. देवाशिष माखिजा यांनी दिग्दर्शित केलेला ‘आज्जी’ हा चित्रपट सारेगामा आणि यूडली फिल्म्स यांची संयुक्त निर्मिती आहे. खेळण्या-बागडण्याच्या अल्लड वयात वासनेची शिकार ठरलेली आपली नात– मंदा- अकाली कोमेजून जावू नये यासाठी तिच्यावर अत्याचार करणा-याला अद्दल
घडवणा-या, धडा शिकवणा-या कठोर आजीची भूमिका सुषमा देशपांडे यांनी ‘आज्जी’ या चित्रपटात रंगवली आहे. स्थानिक राजकारण्याच्या मुलाच्या वासनेची शिकार ठरलेल्या आपल्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारी आजी, राजकारणी आणि पोलीस यांची अभद्र युती, त्यातून सामान्यांवर होणारे परंतु तेवढ्याच ताकदीने दडपून टाकले जाणारे अत्याचार, पीडितेच्या पालकांची होणारी घुसमट, उद्ध्वस्त होत जाणारे कुटुंब आणि या परिस्थितीला शरण न जाता ‘त्या’ नराधमाला अखेरीस धडा शिकवणारी शस्त्रसज्ज झालेली आजी, अशी खुर्चीला खिळवून ठेवणारी ‘आज्जी’ या चित्रपटाच्या कथेची गुंफण आहे.

‘’यूके आशियाई चित्रपट महोत्सवात मिळालेला पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. ‘आज्जी’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते यांच्यासह असंख्य प्रेक्षकांना या पुरस्काराचे श्रेय जाते’’, अशी प्रतिक्रिया सुषमा देशपांडे यांनी पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना व्यक्त केली.

चित्रपटात सुषमा देशपांडे यांच्यासह स्मिता तांबे, सादिया सिद्दीकी, श्रावणी सूर्यवंशी, सुधीर पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. गेल्या वर्षी 24 नोव्हेंबरला ‘आज्जी’ चित्रपटगृहांत झळकला होता. तत्पूर्वी बुसान आणि मुंबई या दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत ‘आज्जी’ वर चित्रपट
समीक्षकांनी स्तुतिसुमने उधळली होती.

सुषमा देशपांडे यांच्याविषयी

रंगभूमी असो वा चंदेरी पडदा, आपली भूमिका अधिकाधिक जिवंत कशी होईल, यावर भर देणे हे सुषमा देशपांडे यांच्या अभिनयाचे सार सांगता येईल.
महाराष्ट्राला संत साहित्याची मोठी परंपरा आहे. या परंपरेत मुक्ताबाई, जनाबाई यांसारख्या महिला संतही महाराष्ट्राला लाभल्या. या महिला संतांनी
तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा कसा सामना केला, त्यांनी स्वतःला सक्षम कसे केले आणि त्यांच्या तुलनेत वर्तमानातील महिलावर्गाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी त्या सक्षम आहेत का, यावर भाष्य करून त्याद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देणा-या सुषमा देशपांडे यांच्या ‘संगीत बया दार उघड’, या नाट्यकृतीला रसिकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. तसेच तमाशातील कलावंतिणींचे जीवन, त्यांच्या आयुष्यात त्यांना काय खस्ता खाव्या लागतात याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी सुषमा देशपांडे स्वतः महाराष्ट्रातील आघाडीच्या तमाशा कलावंतांबरोबर राहिल्या होत्या. त्यातून त्यांनी ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’, या कलाकृतीची निर्मिती केली होती. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

यूके आशियाई चित्रपट महोत्सवाविषयी

युरोपातील हा एक महत्त्वाचा आणि गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेला महोत्सव आहे. प्रवाहाच्या विरोधात पोहून निर्माण करण्यात आलेल्या
कलाकृतींना या महोत्सवात प्राधान्य दिले जाते. विशेषतः दक्षिण आशियातील चित्रपट या महोत्सवात सादर केले जातात. सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या शर्यतीत लेडी बर्ड, द स्क्वेअर आणि फँटम थ्रेड या चित्रपटांतील प्रमुख कलाकार होते.

Web Title: Actress Sushma Deshpande conferred the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.