मुंबई : जागतिक स्तरावरील लॅन्सेट अहवालात मांडण्यात आलेल्या निरीक्षणानुसार, डॉक्टरांना दुसऱ्यांदाा झालेला कोरोनाचा संसर्ग हा तीव्र असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदा झालेला संसर्ग हा बºयाच अंशी लक्षणेविरहित होता, मात्र पुन्हा झालेली कोरोनाची लागण गंभीर असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीत नोएडा येथील दोन डॉक्टर, मुंबईत नायर रुग्णालयातील तीन डॉक्टरांचा आणि हिंदुजा रुग्णालयातील एका डॉक्टरचा समावेश आहे. याविषयी नुकताच अभ्यास अहवाल दिल्लीतील इन्स्टीट्यूट आॅफ जिनॉमिक्स अॅण्ड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी काऊन्सिल आॅफ इंडस्ट्रीअल रिसर्च लॅबोरेटरी संस्थेला सादर करण्यात आला आहे.
नायर रुग्णालयातील डॉ. जयंती शास्त्री यांनी अहवालात संशोधन केले आहे, त्यांनी सांगितले आरोग्य कर्मचारी फ्रंटलाइनवर काम करणारे असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. डॉक्टरांना दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गात कोणताही श्वसनविकार आढळला नाही, कारण ते तरुण वयोगटातील आहेत. मात्र दुसºया वेळी या डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागत आहेत. यातील एका डॉक्टरवर तीन आठवडे उपचार सुरु आहेत. संशोधन अभ्यास अहवाल जागतिक पातळीवर सुरु आहेत, आपल्याकडे याचे प्रमाण अल्प आहे.