मुंबई - जाहिरात श्रेत्रातील मोठे नाव असलेले अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे शनिवारी (17 नोव्हेंबर) निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अॅलेक पदमसी यांनी 1982 मध्ये 'गांधी' चित्रपटात मोहम्मद अली जिना यांची व्यक्तीरेखा साकारली होती.
'हमारा बजाज', 'सर्फ', 'चेरी ब्लॉसम', 'शू पॉलिस', 'एमआरएफ मसल मॅन', 'लिरील गर्ल', 'फेअर अँड लव्हली' 'हँडसम ब्रँड' यासह अनेक आकर्षक जाहिराती अॅलेक पदमसी यांनी केल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ नाटकापासून सुरुवात केलेल्या पदमसी यांनी 60 वर्षांत 70 इंग्रजी नाटकांतून भूमिका केल्या.
मुंबईच्या इंग्रजी नाट्यवर्तुळात काम करताना पदमसी यांनी हिंदी नाटकेही केली. ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकापासून ते ‘शायद आपभी हँसे’ या नाटकापर्यंत त्यांनी अनेक उत्तमोत्तम नाटके केली. त्याशिवाय त्यांनी असंख्य जाहिराती आणि काही चित्रपट केले. अॅलेक यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे.