Join us  

"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:38 AM

Devendra Fadnavis on dharavi redevelopment project adani : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल विरोधकांकडून केल्या जात असलेल्या एका आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले. 

Devendra Fadnavis Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले आहे. पुनर्वसन आणि विकास नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. विरोधकांकडून आरोप केले जात आहे. डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनमध्ये बदल करण्याच्या अधिकाराच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकार सांगेल, तेच अदानींना करावं लागेल, नाहीतर कॉन्ट्रॅक्ट काढून घेऊ, असे ते म्हणाले. 

डीसीआरमध्ये (Development Control Regulations) बदल करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना असतो, पण धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जे सीईओंना यात बदल करण्याचा आरोप होतोय, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये विचारण्यात आला होता. 

धारावी पुनर्विकास-अदानी समूह; फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी जे नियम ठरवले होते, त्यात डीआरपीमध्ये होती. पण, डीआरपीमध्ये डीसीआरचा अधिकार कुणाला आहे, जो प्रधान सचिव स्तरावरील अधिकारी आहे त्याला. महापालिका आयुक्तांच्या समकक्ष असेल, त्याचा अधिकार नाही."

"या शहरामध्ये आठ प्राधिकरणे आहेत. ते आपापली विकास नियमन करते. पण, डीआरसीसह कोणतेही प्राधिकरण विकास नियमन तयार करते, पण त्यांना अधिकार नसतो. ते सरकारला पाठवावे लागते. जर सरकारने म्हटले की, तुमचे विकास नियंत्रण नियम योग्य आहेत. आणि सरकारने त्याला मंजुरी दिली, तरच हे होईल", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अदानींकडून कंत्राट काढून घेऊ -देवेंद्र फडणवीस

"म्हणून मी म्हणालो की, की हे नरेटिव्ह आहे. अदानी कंट्रोल करतील... अदानी कंट्रोल करतील. अरे का करतील? जे काही करायचे आहे, ते सरकार करेल. जे सरकार म्हणेल, तेच अदानींना करावं लागेल. नाही केलं तर त्यांच्याकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", असे सांगत फडणवीसांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर दिले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअदानीमुंबईमहाराष्ट्र