सीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 10:34 PM2020-09-25T22:34:06+5:302020-09-25T22:37:40+5:30

सीएसएमटी लवकरच खासगी हातांमध्ये जाणार; रेल्वे मंत्रालयाकडून तयारी सुरू

Adani tata Interested In Buying Chhatrapati Shivaji Terminus Railway Station | सीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत

सीएसएमटी खासगी हातांमध्ये सोपवण्याची तयारी सुरू; अदानी, टाटा शर्यतीत

googlenewsNext

मुंबई: विमानतळांपाठोपाठ आता रेल्वे स्थानकांचंही खासगीकरण होणार आहे. देशातील सर्वात भव्य रेल्वे स्थानक असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खरेदी करण्याची तयारी अदानी समूहानं सुरू केली आहे. टाटा समूहदेखील सीएसएमटी खरेदी करण्यास उत्सुक आहे. याआधी अदानी समूहानं दिल्लीतलं कनॉट प्लेसजवळील नवी दिल्ली रेल्वे स्थानक खरेदी करण्यातही रस दाखवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) खासगीकरणासाठी आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव उपस्थित होते. या बैठकीत अदानी समूहासोबतच टाटा प्रोजेक्ट्स, जीएमआर, एल्डेको, जेकेबी इन्फ्रास्ट्रक्चर, एल एँड टी, एस्सेल समूहाचे प्रतिनिधी हजर होते. 

"सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू"

नवी दिल्ली रेल्वे स्थानक खरेदी करण्यासही अदानी उत्सुक
रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरटीनं (आरएलडीए) काही दिवसांपूर्वीच नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या खासगीकरणासंबंधी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यातही अदानी समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्र सरकारनं नुकतंच लखनऊ, जयपूर, अहमदाबादसह सहा विमानतळांचं खासगीकरण केलं. ही सर्वच्या सर्व सहा विमानतळं अदानींच्याच ताब्यात गेली आहेत.

दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न

देशातील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश देशातल्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये होतो. सीएसएमटी स्थानक खासगी कंपनीच्या हातांमध्ये सोपवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. ६० वर्षांच्या व्यवसायिक विकासासाठी आणि ९९ वर्षांच्या निवासी विकासासाठी कंपनीसोबत करार करण्यात येईल. रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासात खासगी कंपनी हजारो कोटींची गुंतवणूक करेल, असा रेल्वेचा अंदाज आहे.

 

Web Title: Adani tata Interested In Buying Chhatrapati Shivaji Terminus Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.