Join us

आदर्श सोसायटी पुन्हा हायकोर्टात

By admin | Published: January 03, 2015 2:09 AM

संरक्षण दलाच्या नगर दिवाणी न्यायालयातील दाव्याविरोधात या सोसायटीने पुन्हा उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे़

मुंबई : बहुचर्चित आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या इमारत उभी असलेल्या भूखंडावर दावा सांगणाऱ्या संरक्षण दलाच्या नगर दिवाणी न्यायालयातील दाव्याविरोधात या सोसायटीने पुन्हा उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे़या प्रकरणी याआधीही सोसायटीने याचिका केली होती़ संरक्षण दलाचा सर्वसाधारण अधिकारी हा दावा दाखल करू शकत नाही़ हा दावा दाखल करण्याचे अधिकार केवळ संरक्षण दलाच्या मालमत्ता अधिकाऱ्याला आहेत़ त्यामुळे नगर दिवाणी न्यायालयासमोर संरक्षण दलाच्या दाव्यावर सुनावणी होऊ शकत नाही, असे सोसायटीचे म्हणणे होते़ उच्च न्यायालयात एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर यावर सुनवाणी झाली़ न्यायालयाने ही याचिका फेटाळली़ त्याविरोधात सोसायटीने दोन न्यायाधीशांसमोर पुन्हा अपील याचिका केली आहे़ येत्या १२ जानेवारीला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे़ महाराष्ट्रातील मंत्री व सनदी अधिकाऱ्यांनी घोटाळा करून संरक्षण दलाचा हा भूखंड लाटला असल्याचा संरक्षण दलाचा आरोप आहे़ (प्रतिनिधी)या याचिकेवर १२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे़ महाराष्ट्रातील मंत्री व सनदी अधिकाऱ्यांनी घोटाळा करून हा भूखंड लाटला असल्याचा संरक्षण दलाचा आरोप आहे़