स्किमिंगच्या मदतीने कार्ड धारकाची माहिती चोरली जाते. यासाठी ‘स्कीमर’ या उपकरणाचा वापर करण्यात येतो. ‘स्कीमर’ हे एक छोटे यंत्र असून एटीएममध्ये कार्ड टाकण्याच्या जागेवर ते लावले जाते. एटीएमच्या स्लॉट सारखेच हे उपकरण असल्याने ते निदर्शनास येत नाही. ग्राहक अशा ‘स्कीमर’ लावलेल्या मशीनमधून
व्यवहार करतात, तेव्हा त्यांच्या कार्डची संपूर्ण माहिती ‘स्कीमर’मध्ये साठवले जाते. आरोपी त्या माहितीपासून बनावट (क्लोन) एटीएम कार्ड तयार करून रक्कम काढून घेतात.
.....
क़ाय काळजी घ्यावी
१. स्किमर मशीनद्वारे चोरलेल्या माहितीसाठी पीन क्रमांक आवश्यक असतो. पिन नंबर टाकताना हाताने पिन नंबर झाका. चोरांना तुमचा पिन नंबर माहित नसेल तर कार्डमधील त्यांच्या हाती लागलेल्या माहितीचा काही उपयोग नाही.
2. कुठेही कार्डने व्यवहार करताना सतर्क रहा
3. वेटरच्या हातात कार्ड देवू नका..समोरच व्यवहार करा
4. संशयास्पद वाटल्यासह पोलिसांशी संपर्क साधा
.....