मुंबईत आज महिलांचे लसीकरण बातमीला जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:10 AM2021-09-17T04:10:13+5:302021-09-17T04:10:13+5:30
मुंबईत लसीकरण सुरू झाल्यानंतर मागील सात महिन्यांत ४५ लाख पुरुषांनी लस घेतली आहे. तर ३५ लाख महिलांनी लस घेतली ...
मुंबईत लसीकरण सुरू झाल्यानंतर मागील सात महिन्यांत ४५ लाख पुरुषांनी लस घेतली आहे. तर ३५ लाख महिलांनी लस घेतली आहे. महिलांमध्ये दुसरा डोस घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे महिलांना सहज लस उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या संधीचा लाभ घेतली, असा विश्वास आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.
स्तनदा माता, गर्भवती महिलांचा अल्प प्रतिसाद
केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर मे महिन्यापासून स्तनदा मातांसाठी तर १५ जुलैपासून गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ८ हजार १३२ स्तनदा माता आणि १ हजार ३५० गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.
१८ वर्षांवरील लाभार्थी - ९५ लाख
पहिला डोस - ७५,३७,१४१
दुसरा डोस - ३२,०५७४६
लस घेतलेल्या महिला लाभार्थी - ३५ लाख
स्तनदा मातांचे लसीकरण - ८१३१
पहिला डोस - ६८१५
दुसरा डोस - १३१७
गर्भवती महिलांचे लसीकरण - ११३७
पहिला डोस - ११३७
दुसरा डोस - २१३