Join us  

जोड....लोकशाहीर कृष्णराव साबळे...माहिती-प्रतिक्रिया

By admin | Published: March 20, 2015 10:40 PM

(सर्व आवृत्यांनाही पाठवावे)

(सर्व आवृत्यांनाही पाठवावे)
....................................
लोकशाहीर कृष्णराव साबळेंची प्रसिद्ध गाणी

जय जय महाराष्ट्र माझा
अरे कृष्णा अरे कान्हा
आठशे खिडक्या नऊशे दारं
जेजुरीच्या खंडेराया
हे पावलंय देव माझा भंडारी

प्रसिद्ध नाटक:-
आंधळ दळतंय

पुरस्कार:-
संगीत नाटक अकादमी १९८४
शाहीर अमर शेख पुरस्कार १९८८
महाराष्ट्र गौरव पुरस्कार १९९०
पद्मश्री १९८८
याचबरोबर १९९० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविले होते.
-------------------------------------------------------------------------
(प्रतिक्रि या)
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नाटकाची बस शाहीर साबळेंची आली. त्यानंतर नाटकाच्या बसची प्रथा पडली. खड्या आवाजाचे त्यांना वरदान होते. वसंत देसाई त्यांच्या कार्यक्र मात महाराष्ट्र गीत गाण्यासाठी त्यांनाच बोलवायचे. संगीत आणि लोकनाट्याचे ते गाढे अभ्यासक होते.
-फैय्याज, अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
...................................
शाहीर साबळे हे महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्व होते. १९७५ मध्ये जेव्हा वस्त्रहरण प्रथम रंगभूमीवर आले होते. त्याचा मुहूर्ताचा नारळ शाहीर साबळे यांनी फोडला होता. ६ नोव्हेंबर १९७५ रोजी पहिल्या प्रयोगाच्या वेळी त्यांनी, हे नाटक मोठे यश मिळवेल, असे भाकीत वर्तवले होते. ते तंतोतंत खरे ठरले. शिवसेनेला मोठे करण्यात शाहीर साबळे यांचा मोठा वाटा होता. मराठी माणसाला जागे करण्यात सुरु वातीच्या काळात जी लोकनाट्ये आली होती; त्यात त्यांचे योगदान मोठे होते.
-गंगाराम गवाणकर, नाटककार व ज्येष्ठ रंगकर्मी
...................................
स्पष्ट शब्दोच्चार आणि भावनायुक्त, पण हुकमी आवाज हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या गाण्यांनी मनात कायमस्वरूपी स्थान मिळवले आहे.
ज्ञानेश पेंढारकर, अभिनेता, संगीत रंगभूमी
...................................
माझ्या उमेदीच्या काळात माझा आवाज ऐकून शाहीर साबळे यांनी त्यांच्या महाराष्ट्र गीताच्या ध्वनीफितीचे निवेदन माझ्याकडून करून घेतले होते. त्यांच्यासोबत माझा चांगला संबंध होता. त्यांनी लोकांसाठी खूप काही करून ठेवले आहे. महाराष्ट्र गीत म्हणजे शाहीर साबळे हे समीकरण कायम अतूट राहणार आहे.
प्रमोद पवार, अभिनेता, निवेदक
...................................