Join us

विद्यार्थ्यांवरील परीक्षांच्या अतिरिक्त ओझ्याला पुढील निर्णयापर्यंत स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 2:32 AM

केंद्राकडून केल्या जाणाऱ्या नॅस या सर्वेक्षणात कामगिरी सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात येणा-या अध्ययन निष्पत्ती परीक्षेला पालिका शिक्षण विभागाकडूनच अखेर स्थगिती मिळालीे.

मुंबई : केंद्राकडून केल्या जाणाऱ्या नॅस या सर्वेक्षणात कामगिरी सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात येणा-या अध्ययन निष्पत्ती परीक्षेला पालिका शिक्षण विभागाकडूनच अखेर स्थगिती मिळालीे. फळ्यावर प्रश्नपत्रिका देण्यापासून ते उत्तरपत्रिका तपासणीपर्यंत शिक्षकांना या परीक्षेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार होती. त्यामुळे अनेक संघटना व शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर पुढील निर्देश येईपर्यंत चाचणीला स्थगिती देण्याचे निर्देश पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिले आहेत.मुंबईतील हा दर्जा सुधारण्यासाठी एनएएसच्या धर्तीवर सराव शाळांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते दहावीसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ही परीक्षा ज्ञान, आकलन, उपयोजना, पृथक्करण, संश्लेषण या उद्दिष्टांवर आधारित आहे. ती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शाळांमध्ये आयोजित केली होती. चाचणीसाठी विषयनिहाय, इयत्तानिहाय, माध्यमनिहाय अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका तयार करणे याची जबाबदारी माध्यमनिहाय नोडल अधिकाºयावर होती. परंतु, एकाच दिवशी सर्व विषयाच्या सराव परीक्षा होणार असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी त्या प्रचंड तणावाच्या असल्याचे मत शिक्षण सदस्यांनी व्यक्त केले होते. आता या चाचणीला स्थगिती मिळाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :परीक्षा