विनायक नरवडे याने देशात ३७ वा क्रमांक पटकावून महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नगर येथील सावेडीतील असून त्याचे प्राथमिक शिक्षण आठरे पाटील स्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा महाविद्यालयात पूर्ण झाले. पुढे पुणे येथून अभियांत्रिकीच्या पदवीचे शिक्षण घेऊन त्यांनी अमेरिकेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली व काही काळ नोकरीही केली. परंतु आयएएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे अभ्यासासाठी नोकरीवर पाणी सोडून ते पुन्हा मायदेशी परतले. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र यंदाच्या परीक्षेत त्यांनी अखेर यशाला गवसणी घातली. विनायकचे वडील व बहीण डाॅक्टर असून आई गृहिणी आहे. आपण केलेल्या कष्टाचे हे चीज असून कुटुंबीयांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे विनायकने सांगितले.
जोड : आयआयटी मुंबईचा पदवीधर शुभम कुमार यूपीएससीत पहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:07 AM