जोड : मनपा मैदानाचे कार्यादेश निघाले; पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:09 AM2021-09-05T04:09:43+5:302021-09-05T04:09:43+5:30

- गेल्या ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. - आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ ...

Addition: Municipal ground work orders issued; But | जोड : मनपा मैदानाचे कार्यादेश निघाले; पण

जोड : मनपा मैदानाचे कार्यादेश निघाले; पण

Next

- गेल्या ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.

- आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ आहे.

- शहरातील एकूण ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ गेल्या २० वर्षांत कमी झाली आहे.

- सर्वाधिक फटका गोरेगावला बसला आहे.

- २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवाई असलेल्या गोरेगावमध्ये २०११ मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली.

- अंधेरी पश्चिम व मालाड भागांतील हिरवळ कमी झाली आहे.

- अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, सायन, परळ, दादर, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला व पवई या परिसरात हिरवाईची कमतरता आहे.

---------------------

- ३० वर्षांमध्ये १२,४४६ हेक्टर परिसरावरील हरित कवच नष्ट झाले आहे.

- गेल्या तीन दशकांमध्ये हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट.

- १९८८ मध्ये मुंबईच्या एकूण ६३,०३५ हेक्टर या क्षेत्रफळामध्ये २९,२६० हेक्टरचे हरित कवच होते.

---------------------

मुंबई शहर आणि उपनगरातील मोकळ्या जागा गिळंकृत करण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: मैदानात अतिक्रमण करून, बांधकामे करून मैदानांचा वापर केला जात आहे. मैदानांत डेब्रिज टाकून मैदानाची दुरवस्था केली जाते. महापालिकेकडे मैदानांच्या, उद्यानांच्या दुरवस्थेबाबत कित्येक तक्रारी प्राप्त होत असल्या तरी कार्यवाही नाममात्र आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्याने आणि मैदानांच्या सुशोभिकरणासह उर्वरित घटकांसाठी दिला जाणारा निधीदेखील खर्च केला जात नाही. परिणामी, मैदाने आणि उद्याने आणखी वाईट होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Addition: Municipal ground work orders issued; But

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.