जलवाहिन्यांच्या ‘बंच’मध्ये ‘ओव्हर फ्लो’ गटारांचीही भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:16+5:302020-12-29T04:07:16+5:30
राठोडीतील वार्ड क्रमांक ३३ मधील प्रकार - मच्छरांच्या प्रादुर्भावाने आजारी पडण्याची भीती फोटो मस्ट ( मेल केला आहे ) ...
राठोडीतील वार्ड क्रमांक ३३ मधील प्रकार
- मच्छरांच्या प्रादुर्भावाने आजारी पडण्याची भीती
फोटो मस्ट ( मेल केला आहे )
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न जरी प्रशासन करत असले, तरी मालाडच्या राठोडी गावातील वार्ड ३३ मधील गटारांची स्थिती भयावह झाली आहेत. जलवाहिन्याच्या ढिगामध्ये आता ओव्हर फ्लो झालेल्या गटारांचीही भर पडल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. ‘आम्ही चालायचे तरी कुठून?’ असा सवाल स्थनिकांकडून नगरसेवकाकडे उपस्थित केला जात आहे.
राठोडी गावचा वार्ड क्रमांक ३३ हा काँग्रेसचे नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांच्या हद्दीत येतो. ज्यांनी नुकताच ‘प्रजा फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या वार्षिक प्रगतिपुस्तकात उत्कृष्ट कामगिरीबाबत मान पटकावला आहे. त्यांच्याच परिसरात मोडणाऱ्या शिवसमर्थ सोसायटीच्या चाळींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गटार तुंबल्याने त्याचे पाणी आता गल्लीमध्ये जमा होत आहे. परिणामी, त्या ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून, घाणेरड्या पाण्यातून, तसेच जलवाहिन्यांच्या जाळ्यातून जीव धोक्यात घालत नागरिकांना येजा करावी लागले. ज्यात लहान मुले आणि वृद्धांना घसरून पडल्यास मोठी दुखापत होण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत. त्यामुळे स्थानिक हैराण झाले आहेत. या ठिकाणी पालिकेच्या पी उत्तर विभागात जलवाहिन्याचे बंच काढण्यात येणार होते. मात्र, ते कामही गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यात आता गटारांच्या ओव्हर फ्लोची भर पडल्याने यातून लवकरात लवकर सुटका करण्याची विनंती नागरिक करत आहेत. या प्रकरणी चौधरी यांना कॉल, तसेच मेसेज करत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
‘लवकरच जलवाहिनी शिफ्ट करून घेतो’
‘आम्हाला संबंधित ठिकाणचे फ़ोटो पाठवून द्यावे, जेणेकरून संबंधित अधिकाऱ्याला सांगून जलवाहिनी शिफ्टिंगचे काम आम्ही लवकरात लवकर करून घेतो.’
(जी. कोरे - दुय्यम अभियंता, जलविभाग - पी उत्तर)