15 डब्यांची अतिरिक्त लोकल हिंदोळ्यावरच

By admin | Published: June 29, 2014 11:12 PM2014-06-29T23:12:24+5:302014-06-29T23:12:24+5:30

मध्य रेल्वेने गेल्या वर्षी मुख्य मार्गावरील सीएसटी-कल्याण या जलद गती दिशेवर 15 डब्यांची एक लोकल सुरु केली.

Additional coaches of 15 coaches are in Hindo | 15 डब्यांची अतिरिक्त लोकल हिंदोळ्यावरच

15 डब्यांची अतिरिक्त लोकल हिंदोळ्यावरच

Next
>ठाणो : मध्य रेल्वेने गेल्या वर्षी मुख्य मार्गावरील सीएसटी-कल्याण या जलद गती दिशेवर 15 डब्यांची एक लोकल सुरु केली. या लोकलच्या फे:यांना मिळणारा प्रतिसाद बघता याच मार्गावर तसेच ग्रामीण भागातील बदलापूर स्थानकार्पयत या लोकलचा विस्तार होईल आणि त्यासोबतच जादाचा रेकही उपलब्ध होणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही प्रस्ताव धूळखात पडले असून त्यांची पूर्तता एवढय़ात होणार नसल्याचेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. 
म.ऱेचे तत्कालीन महाव्यस्थापक सुबोध जैन यांच्या पुढाकारामुळे दोन वर्षापूर्वी मुख्य मार्गावर ही लोकल धावली. 15 डब्यांच्या गाडय़ा धावण्यासाठी डोंबिवली, ठाणो, मुलुंड, भांडुप आदी ठिकाणच्या जलद गती मार्गावरील फलाटांची लांबी वाढवली होती. आजमितीस मात्र केवळ एका रेक्ससाठी व त्या माध्यमातून होणा:या नाममात्र फे:यांसाठी झालेला खर्च आदी का केला, त्यासाठी डोंबिवलीतील तोडण्यात आलेले स्वच्छतागृह, त्याची पुनर्बाधणी, वाढीव फलाटांना छत, विद्युतपुरवठा, सिगAलचा खांब बदलला असल्यास ती तरतूद आदीही सर्व बाबी कराव्या लागल्या. आता जर या सुविधा दिल्याच आहेत तर 15 डब्यांचे वाढीव रेक्सही उपलब्ध करावेत, जेणोकरून प्रवाशांमध्ये समाधान होईल, अशी भावना उपनगरीय प्रवासी एकता संस्थेने व्यक्त केली.
सध्या जी लोकल आहे, तिला प्रतिसाद जरी चांगला असला तरीही अशाच पद्धतीने आणखी एखादा रेक्स उपलब्ध होईल न होईल, याचे कुठल्याही प्रकारे संकेत रेल्वे बोर्डाकडून अद्यापतरी आलेले नाहीत. ते कधी येतील, याच्या प्रतीक्षेत आम्हीही आहोत, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Additional coaches of 15 coaches are in Hindo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.