ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभुत विकास होण्याकरिता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेला नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंजुरी देण्यात आली व आता सदर योजनेच्या माध्यमातुन तीर्थक्षेत्रांना सुमारे २००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. तसेच पर्यटन विभागामार्फत देखील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत सुमारे १००० कोटी रुपयांचा निधी हा तीर्थक्षेत्रांच्या पर्यटन विकासासाठी उपलबध करुन दिला आहे.
तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.ह.भ.प. प्रकाश महराज बोधले व यांच्या समवेत सर्व श्री.ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण दशरथ मेंगडे, परमेश्वर गणपत बोधले, लक्ष्मण् बाबुराव तकीक, विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, राधाबाई ज्ञानोबा सानप सह महाराष्ट्रातील अनेक संत महंत, किर्तनकार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा विधीमंडळात सत्कार केला व आभार व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भव्य काशी दिव्य काशी, बद्री केदार देवस्थान विकास, उजैन येथील महाकाल कॉरिडोअर, अयोध्यास्थित प्रभु श्रीराम जन्मभुमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धरतीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजूरी दिली. आता ब वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटी ऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध होत आहे.
ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक/ यात्रेकरुंना विविध सोईसुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नागपूर येथे झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाने घेतला. २०१२ पासून दोन कोटी इतका निधी दिला जात असे. त्यात आता आणखी तीन कोटींची भर पडली आहे. १६ नोव्हेंबर २०१२ नंतर २ कोटी या मर्यादेत निधी मंजूर केलेल्या तिर्थक्षेत्रांना नविन प्रस्तावित निकषाप्रमाणे ३ कोटी इतका निधी मंजूर करण्यात येत आहे.
या निधीतून काय करता येईल?तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह, शौचालय, वाहनतळ, भक्त निवास, रस्त्यावरील दिवे आणि संरस्क्षण भिंत, वृक्ष लागवड करणे इत्यादी सुविधा या निधीतून उपलब्ध करुन दिल्या जातील.
४८० तीर्थक्षेत्रांना होणार लाभराज्यात ब वर्ग दर्जा असलेली १६ नोव्हेंबर २०१२ पुर्वी १०५ तिर्थक्षेत्र मंजूर होती. त्यानंतर ३७५ तिर्थक्षेत्र मंजूर करण्यात आले. अशी राज्यात एकूण ४८० ब वर्ग तिर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्रांना वाढीव निधीचा लाभ होणार आहे.
निधीसाठी काय आवश्यक?तिर्थक्षेत्रास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या 4 लाख असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक.