Join us

अपर सचिव देबाशिष चक्रवर्ती करणार परमबीर सिंग यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरत असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची प्राथमिक चौकशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरत असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी सरकारने आता नियोजन विभागाचे अपर सचिव देबशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती केली आहे.

परमबीर सिंग यांच्याकडून सेवा नियमाचे उल्लंघन व पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत प्राथमिक चौकशी करून चक्रवर्ती यांना अहवाल सादर करायचा आहे.

राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी चौकशी करण्यास नकार दिल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला होता. सिंग यांनी संजय पांडे यांच्याशी व्हाॅटस्‌ॲप काॅलवरून केलेले संभाषण रेकॉर्ड केले. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पांडे यांनी या प्रकरणाचा परिणाम होऊ नये, यासाठी चौकशीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नियोजन विभागाचे अप्पर सचिव चक्रवर्ती याप्रकरणी चौकशी करतील, ते १९८६ च्या आयएएस बॅचचे आधिकारी आहेत. या चौकशीच्या अहवालाच्या आधारावर परमबीर सिंग यांच्यावर कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.

........................