मॉल्स, रेल्वे स्थानकांच्या सफाईसाठी जादा कामगार

By admin | Published: November 7, 2014 01:29 AM2014-11-07T01:29:51+5:302014-11-07T01:29:51+5:30

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाने मुंबईतही वेग घेतला़ मात्र पालिकेच्या गाड्या आजही काही ठिकाणी पोहोचत नसल्याने नाक्यांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे़

Additional workers cleaning malls, railway stations | मॉल्स, रेल्वे स्थानकांच्या सफाईसाठी जादा कामगार

मॉल्स, रेल्वे स्थानकांच्या सफाईसाठी जादा कामगार

Next

मुंबई : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाने मुंबईतही वेग घेतला़ मात्र पालिकेच्या गाड्या आजही काही ठिकाणी पोहोचत नसल्याने नाक्यांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे़ अशा काही तक्रारी आल्यानंतर पालिका वर्दळीच्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्थळांच्या सफाईसाठी जादा कामगार लावणार आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान जाहीर केले़ त्यानुसार मुंबईत महापालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन आपल्याच इमारतींच्या सफाईला सर्वप्रथम सुरुवात केली़ मात्र स्वच्छतेसाठी कामगारवर्ग कमी पडत असल्याचे यात प्रकर्षाने जाणवले़ त्यामुळे यात सर्व खात्यांतील कर्मचाऱ्यांनाच शुक्रवारी दोन तास सफाई करण्यास भाग पाडण्यात आले आहे़
मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातील काही महत्त्वाच्या स्थळांची रोज सफाई ठेवणे आवश्यक असल्याचे या वेळी लक्षात आले़ त्यानुसार संपूर्ण २४ वॉर्डांतील अधिकारी कामाला लागले असून काही दिवसांतच अशा ठिकाणांची यादी तयार होणार आहे़ यामध्ये मॉल, रेल्वे स्थानक, पुरातन वास्तू, पर्यटनस्थळांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Additional workers cleaning malls, railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.