Join us

कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सेस यांची कमतरता दूर करा, ठाकरे गटाची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: October 09, 2023 6:34 PM

अनिल परब  यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने डॉ. आर.एन.कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. 

मुंबई - विलेपार्ले पश्चिम डॉ. आर.एन.कूपर रुग्णालयात रोज सुमारे 5000 नागरिक उपचारासाठी येतात. येथे सुमारे 23 टक्के डॉक्टर आणि नर्सेस यांची कमतरता असून गंभीर रुग्णाला आयसीयू बेड मिळण्यासाठी वेटिंग असल्याने किमान एक-दोन महिने वाट बघावी लागते.त्यामुळे त्याचा येथील आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होतो. परिणामी येथे पूर्ण क्षमतेने डॉक्टर्स आणि नर्सेस यांची कमतरता भरून काढावी,तसेच आयसीयू बेडची संख्या वाढवावी या मागणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून व विभागप्रमुख आमदार अनिल परब  यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने डॉ. आर.एन.कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. 

येथे असलेली अपुरी डॉक्टरांची व्यवस्था व नर्सेस यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना  होणारा त्रास या सर्व विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली व त्या लवकरात लवकर या समस्या सोडावाव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला अशी माहिती विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर यांनी लोकमतला दिली.  यावेळी नितीन डीचोलकर,अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम, समन्वयक सुनील खाबिया,महिला विधानसभा संघटक रूपाली शिंदे व वीणा टॉक,उपविभागप्रमुख प्रसाद आयरे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई