Join us

आरेतील आदिवासींना तेथेच मिळणार पक्की बैठी घरे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:03 AM

आरेतील विविध आदिवासी पाड्यांत राहणाºया रहिवाशांना लवकरच पक्की बैठी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आरेतील अन्य पात्र झोपडीधारकांनाही प्राणिसंग्रहालयासाठी राखीव जागेवर आरक्षण बदलून घरे देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री

मुंबई : आरेतील विविध आदिवासी पाड्यांत राहणाºया रहिवाशांना लवकरच पक्की बैठी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आरेतील अन्य पात्र झोपडीधारकांनाही प्राणिसंग्रहालयासाठी राखीव जागेवर आरक्षण बदलून घरे देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना सांगितले.आरेतील आदिवासी पाड्यांना गावठाणांचा दर्जा देऊन येथील रहिवाशांना आरेतच एकाच ठिकाणी पक्की घरे बांधून स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी वायकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आरेतील आदिवासी पाड्यांना गावठाणांचा दर्जा देऊन त्यांना आरेतच बैठी पक्की घरे देण्यात येतील.तसेच शासनाच्या नियमानुसार अन्य पात्र झोपडीधारकांनाही आरेतील प्राणिसंग्रहालयासाठी आरक्षित जागेचे आरक्षण उठवून तेथे घरे देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या भेटीत दिल्याचे रवींद्र वायकर यांनी सांगितले. शिवाय, याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाला दिल्याचे वायकर म्हणाले.आरेमध्ये २७ आदिवासी पाडे व विखुरलेल्या झोपड्या मिळून सुमारे १० हजारांच्या घरात रहिवासी वास्तव्य करीत आहेत. हरित लवादाच्या आदेशामुळे येथील रहिवासी अद्याप काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. 

टॅग्स :घर