आदित्य, आयत्या बिळावर...

By admin | Published: February 24, 2016 01:53 AM2016-02-24T01:53:17+5:302016-02-24T01:53:17+5:30

वांद्रे येथील विकासकामांच्या श्रेयावरून मंगळवारी मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशीष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात टिष्ट्वटर युद्ध रंगले. माझ्या मतदारसंघातील

Aditya, on the other hand ... | आदित्य, आयत्या बिळावर...

आदित्य, आयत्या बिळावर...

Next

मुंबई : वांद्रे येथील विकासकामांच्या श्रेयावरून मंगळवारी मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशीष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात टिष्ट्वटर युद्ध रंगले. माझ्या मतदारसंघातील कामे करून दाखवायला मी कोणाची नियुक्ती केली नाही. ऐनवेळी श्रेयासाठी होर्डिंग्ज लावणारे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टोला शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर होत असलेल्या या वाक्युुद्धामुळे दोन्ही मित्रपक्षांमधील तेढ पुन्हा समोर आली आहे.
वांद्रे रेक्लेमेशन येथे खुल्या मैदानासाठी २२ एकरचा भूखंड देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या जागेवर एमएसआरडीसी खेळासाठी खुले मैदान विकसित करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून केली. त्यानंतर सदर
जागा रस्त्याच्या बाजूला
नाही तसेच खाडीजवळही नाही. त्यामुळे या मैदानाचा कोणाला अडथळा नाही.
एमएसआरडीसी या मैदानाचे बांधकाम आणि डागडुजी करेल. ते सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती देणारे दुसरे टिष्ट्वट ठाकरेंनी केले.
या टिष्ट्वटमुळे संतप्त झालेल्या आशीष शेलारांनी टिष्ट्वटरवर आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली. मी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठीचा हा श्रेय घोटाळा असल्याचे सांगत शेलारांनी तब्बल २१ टिष्ट्वटची मालिकाच चालविली. श्रेयाच्या राजकारणामुळेच आतापर्यंत राज्याची अधोगती झाली.
ज्याचे त्याला श्रेय द्या, असे
आवाहनही आदित्य ठाकरे यांना
केले. (प्रतिनिधी)

21 वर्षांपासून एकत्रितपणे पालिकेचा कारभार हाकणाऱ्या शिवसेना-भाजपात सध्या तणातणी आहे. केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजपा प्रकल्प पळवत असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे़ त्यामुळे शिवसेनेने सोमवारी पालिका अर्थसंकल्पात सुधारणा करीत ५०० कोटींच्या नव्या योजनांची घोषणा केली. यामध्ये थीम पार्क, क्रिकेट व फुटबॉल अ‍ॅकॅडमी स्थापन करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली.

यापूर्वीचे टिष्ट्वटर वाद
मरिन ड्राइव्हवर बसविलेल्या शुभ्र दिव्यांनी राणीच्या हाराची लकाकीच हरवली, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता़ त्यास प्रत्युत्तर देताना, संपूर्ण माहिती आणि सबुरी ठेवून प्रतिक्रिया दिल्यास त्या आवाजाला लोकशाहीत वजन मिळते, असा चिमटा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काढला आहे़

मुंबईत नाइट लाइफ व गच्चीवर रेस्टॉरंट सुरू करण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाही भाजपाने सुरुंग लावला होता़ त्या वेळीही अ‍ॅड़ शेलार यांनी ही संकल्पना मांडणाऱ्या युवराजांची टिष्ट्वटरवरून खिल्ली उडवली होती़

Web Title: Aditya, on the other hand ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.