Join us

कुणाचं काय तर कुणाचं काय! आदित्य, सिंगल आहे का?; एका मुलीचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 2:52 PM

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांवर पोहचली आहे तर २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई – सध्या संपूर्ण जगासह देश आणि राज्यात कोरोना व्हायरसचं संकट उभं आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. भारतातही ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. प्रत्येक जण या संकटाचा सामना करण्यासाठी एकजुटीने पुढे आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घेऊन कोरोनाचा मुकाबला करत आहे.

जगातील २० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ लाख ६० हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी युद्ध करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे लोक दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. राज्यातही कोरोना झपाट्याने वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपुलकीच्या नात्याने लोकांची संवाद साधत आहेत.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांवर पोहचली आहे तर २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी बोलत आहेत. लोकांनी काय खबरदारी घ्यायला हवी. सरकारचे नियम पाळले जावेत. सोशल डिस्टेंसिगचं पालन करण्यात यावं. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन या युद्धात लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कामाचं सोशल मीडियात भरभरुन कौतुकही केलं जात आहे. पण अशा कठीण परिस्थितीतही काही माणसं नकळत प्रसिद्धीच्या झोकात येऊ पाहतात.

उद्धव ठाकरे लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना एका मुलीने मी सिंगल आहे, आदित्य सिंगल आहे का? असा प्रश्न केला. आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार तसेच राज्याचे पर्यटनमंत्री असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव सुद्धा आहेत. त्यामुळे वडील उद्धव ठाकरेंकडे एका मुलीने मुलासाठी मागणी घातल्याचा हा स्क्रीनशॉट्स सोशल मीडियात धुमाकूळ घालतोय. निकीता सोनावणे नावाच्या एका ट्विटर युजरने हे ट्विट केलं आहे. यावर हजारो जणांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे एकीकडे इतकं संकट असतानाही दुसरीकडे अशाप्रकारच्या काही लोकांमुळे सोशल मीडियात नक्कीच हशा पिकतो

टॅग्स :आदित्य ठाकरेउद्धव ठाकरेसोशल व्हायरल