"मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र तिथे..."; रेसकोर्सची जागा BMC देण्यास मंजुरी मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 02:43 PM2024-06-26T14:43:59+5:302024-06-26T14:50:24+5:30

Mumbai News: महालक्ष्मी रेसकोर्सची १२० जागा मुंबई महानगरपालिकेला देण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे.

Aditya Thackeray criticism after the state government approval to give the Mahalakshmi Race Course site to BMC | "मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र तिथे..."; रेसकोर्सची जागा BMC देण्यास मंजुरी मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप

"मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र तिथे..."; रेसकोर्सची जागा BMC देण्यास मंजुरी मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा संताप

Mumbai Mahalaxmi Racecourse : महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या मुद्दावरुन वातावरण तापलेलं असताना राज्य सरकारने तिथली १२० जागा मुंबई महापालिकेला देण्यास मंजुरी दिली आहे. रेसकोर्सची १२० एकर जागा ताब्यात घेण्यास महापालिकेला सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे. या निर्णयावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि सरकारवर टीका केली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य  मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यात येणार आहे. रेसकोर्सवरील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला भाडेपट्टयाने दिलेल्या भूखंडावरील कराराची मुदत संपल्यामुळे या ठिकाणी भव्य उद्यान करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले होते. त्याला सरकारने मंजुरी देखील दिली होती. त्यानंतर आता महालक्ष्मी रेसकोर्सवरील २११ एकर जागेपैकी ९१ एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित १२० एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मात्र या निर्णयावरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. "रेसकोर्सची जागा महापालिकेच्या ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच असेल की तिथे रेसकोर्ससारखी मोकळी जागा राहावी. मुख्यमंत्र्यांचे बिल्डर मित्र तिथे येऊ नयेत ही आमची मागणी आहे. अंडरग्राऊंड पार्किंग आणि क्लब हाऊसची तिथे गरज नाहीये. जसे मोकळे मैदान आहे ते तसेच ठेवून लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. आरडब्लूआयटीसीच्या माध्यमातून जो करार केला गेला तो कोणाच्या फायद्यासाठी केला, त्या बैठकीत कोण होतं याबाबत आम्ही चौकशी करुच. घटनाबाह्य मुख्यमंत्र्‍यांच्या बिल्डर मित्राला ही जागा मिळू नये ही आमची मागणी असून त्यासाठी आम्ही लढा उभारू," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, रेसकोर्सवरील १२० एकर जागेवर पालिकेला थीम पार्क उभारणार आहे. १२० एकर जागेवर उद्यान साकारले जाणार असून ते कोस्टल रोडवरील उद्यानाला भूमिगत मार्गाने जोडले जाणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप केला होता. यासाठी वर्षा बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Web Title: Aditya Thackeray criticism after the state government approval to give the Mahalakshmi Race Course site to BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.