मुंबई पालिकेत टेंडर, ट्रान्सफर अन् टाइमपास, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:31 AM2022-11-19T11:31:38+5:302022-11-19T11:32:05+5:30

Aditya Thackeray : राज्यात नवे सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे, फक्त घोषणाबाजी सुरू आहे, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पत्र परिषदेत केली. 

Aditya Thackeray criticizes tender, transfer and time pass in Mumbai Municipality | मुंबई पालिकेत टेंडर, ट्रान्सफर अन् टाइमपास, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई पालिकेत टेंडर, ट्रान्सफर अन् टाइमपास, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

googlenewsNext

मुंबई : राज्यात नवे सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे, फक्त घोषणाबाजी सुरू आहे, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पत्र परिषदेत केली. 
ते म्हणाले, मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच हजार कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केली होती. निविदादेखील काढण्यात आल्या पण त्या रद्द करण्यात आल्या. का? मर्जीतील लोकांनी निविदा भरल्या नाहीत म्हणून का? असा सवालही ठाकरे यांनी केला. 
या घोषणेमुळे गेल्यावर्षीची आणि यावर्षीची कामेही सुरू झाली नाहीत. महापौर आणि स्थायी समिती अस्तित्वात नसताना राज्य सरकारने एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा? असा सवालही त्यांनी केला.

Web Title: Aditya Thackeray criticizes tender, transfer and time pass in Mumbai Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.