मुंबई - वरळी कोळीवाड्यात माजी मंत्री, युवा सेनाप्रमुख व वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्याच्या हावली उत्सवाला भेट दिली. विशेष म्हणजे त्यांनी कोळी गाण्यांवर ठेका धरला आणि हावलीची मनोभावे पूजा केली. यावेळी आमदार व शिवसेना उपनेते सचिन अहिर, माजी खासदार संजय दिना पाटील, माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासमवेत नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व वरळी कोळीवाडा माणिक धर्मा पाटील जमात पाटीलचे विजय वरळीकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील तसेच इतर शासकीय अधिकारी व राजकीय पक्षांचे नेत्यांनी उपस्थित राहून समाजाचा उत्साह वाढविला.
मुंबईच्या सात बेटावरील मूलनिवासी अध्य नागरिक म्हणजे कोळी समाज त्यांचे मुख्य सण होळी व नारळी पौर्णिमा आपल्या रूढी परंपरा जपून उत्साहाने साजरे करतात. वरळी कोळीवाड्यात प्रत्येक गल्लीत महाशिवरात्र झाल्यानंतर वरळी कोळीवाड्यामध्ये महाशिवरात्र झाल्यानंतर प्रत्येक गल्लीत विभागामध्ये किंवा घरासमोर छोटी होळी लावली जाते. कोळी समाजा हा मोठा सण असल्यामुळे सासुरवासिनी माहेरी आल्या होत्या. या दिवशी होळीस नैवेद्य म्हणून मुख्यत्व पुरणपोळी होती.
वरळी कोळीवाडा हे कोळी मच्छीमार समाजाचे गाव. येथे अजूनही कोळी मच्छीमार समाजातील पाटील पद्धत आहे. येथे नऊ पाटील जमाती (कुटुंब) आहेत व त्या धर्मादाय आयुक्त्यांकडे नोंदणी होत आहेत या सर्व जमाती आपल्या कोळी रुढी परंपरेनुसार आणि संस्कृतीचे संवर्धन करत होलीकोउत्सव साजरा करतात. यात सर्व पाटील आमंत्रित असतात व सहभाग घेतात अशी माहिती विजय वरळीकर यांनी दिली.
रात्री बारानंतर दुसऱ्या विभागातून मिरवणुकीने मडक्यातून अग्नी आणून होळीला अग्नी देण्यात आला. पारंपारिक फेर धरून गाणी नृत्य करून होळीचे गुणगौरव गायले गेले. पूर्वी सुप्रसिद्ध बालकरांम वरळीकर यांचा संच गावातील घराण्याला भेट देऊन पारंपारिक कोळी होळीची गीते गाऊन टिपऱ्या म्हणजे दांडिया,नृत्य करावयाचे याची आठवण त्यांनी दिली.
वरळी कोळीवाडयाचे हावलीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्म व समाजाचे नागरिक कुटुंबा सहित उत्सवात भेट दिली. हावलीच्या दिवशी मच्छीमारांनी आपल्या बोटींना सजवून , पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली. तसेच आज रंगपंचमीला आपल्या कुटुंबासह आमंत्रित पाहुण्यांना घेऊन आणि समुद्राला फेरफटका मारून धुमधडाक्यात हावली आणि रंगपंचमीचा उत्सव साजरा केला अशी माहिती विजय वरळीकर यांनी दिली.